श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १७
त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र क्षणं क्ष्मा च लक्ष्मीः स्वयं तं वृणाते | किरीटस्फुरच्चामरच्छत्रमालाकलाचीगजक्षौमभूषाविशेषैः ‖ १७ ‖ ज्यावेळी एखाद्या शरणागत भक्ताला भगवंताची कृपा होते त्यावेळी त्याला कोणकोणते अद्वितीय लाभ होतात ते सांगतांना जगद्गुरु श्रीशंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र- हे त्र्यक्ष अर्थात तीन नेत्र असणाऱ्या भगवान शिवशंकरा ! आपल्या नेत्राचा कटाक्ष जेथे पडतो. अर्थात ज्या […]