श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ४
शिवेशानतत्पूरुषाघोरवामादिभिः पंचभिर्हृन्मुखैः षड्भिरंगैः | अनौपम्य षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं परं त्वां कथं वेत्ति को वा ‖ ४ ‖ भगवान श्रीशंकरांच्या अगम्यतेचे वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात, शिवेशानतत्पुरुषाघोरवामादिभिः पंचभिर्हृन्मुखैः- शिव, ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव या पाच प्रसन्न मुखांनी. येथे भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाचे वर्णन आले आहे. यातील शिव किंवा ज्याला सद्योजात असेही नाव आहे ते जलतत्वाचे, ईशान हे पृथ्वी […]