स्वातंत्र्यवीरांचे मुंबईतील वास्तव्य – सावरकर सदन
शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या निवासाने पावन झालेली इमारत इतिहासाची आजही साक्ष देते. ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर साऱ्या देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या या वास्तूला तसा इतिहास आहे आणि ही वास्तू म्हणजे हिंदुस्थानवासींना नवविचारांसह दिशादर्शन करणारे प्रेरणास्थान ठरले आहे. शिवाजी पार्क येथे गेल्यावर डॉ. मधुकर बी. राऊत मार्गावर ‘बालमोहन विद्यामंदिर’ शाळेच्या बाजूला गेल्यावर पांढऱ्या रंगाची इमारत आपल्याला समोर दिसते. […]