कवठ : एक विस्मृतीत गेलेले फळ
कवठ हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काटेरी व पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. भारतासहीत पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात. हे फळ दक्षिण महाराष्ट्रात खूप प्रमाणात आढळते. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात या वृक्षाची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात आहे. त्यामुळेच औदुंबर, नरसोबावाडी येथे मिळणारी प्रसिद्ध कवठ बर्फी दुसरीकडे मिळत नाही. […]