बचत गटाच्या मूर्ती पोहोचल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर!
आदिवासींच्या बोहाडा या उत्सवासाठी विविध मुखवटे बनविण्याची वडिलोपार्जित कला जोपासत स्वत:च्या कर्तृत्वाने कागदाच्या लगद्यापासून सुंदर मूर्ती बनविण्याचे काम जव्हार तालुक्यातील रामखिंड येथील पेपरमेशी स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट करीत आहे.ही कलाकृती त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेण्याचा मान मिळविला आहे.
[…]