अजिंठा लेणी फोटो
अजिंठा लेण्यांच्या आतील हा सुंदर फोटो…. — संतोष पाटील
अजिंठा लेण्यांच्या आतील हा सुंदर फोटो…. — संतोष पाटील
यतीन कार्येकर, एक अत्यंत संवेदनशील, तरल, अंडरप्ले करणारा जातिवंत अभिनेता. कोणतीही भूमिका त्याला द्या, त्या भूमिकेचे तो सोनेच करणार! मुन्नाभाई एम् बी बी एस् मधला तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता त्या बडबड्या चित्रपटात स्वतःच्या अभिनयाची आगळी छाप सोडून जाणारी आनंदभाईची भूमिका जगणारा सच्चा कलावंत. थरारमधला चिकित्सक, शोधक, खराखुरा वाटणारा इन्स्पेक्टर कर्णिक साकारणारा नटवर्य तर वयाच्या तिशीतच साठीतला कामेश महादेवन साकारणारा रंगकर्मी. […]
मास्को येथील संग्रहालयामध्ये असलेले छत्रपति शिवाजी महाराज यांचे हे मूळ छायाचित्र आहे असे म्हणतात, त्यांना समोर बसवून हे काढले आहे व त्यावर त्यांचे हस्ताक्षर पण आहे. […]
हे नवीनच शिर्षक वाचून आश्चर्य वाटलं? खरं आहे. संगणकावर काही पसारा असू शकतो याचं भानच आपल्याला बऱयाचदा नसतं. एकदा का संगणक घरी आला की त्याच्यावर पाहिजे तेवढी माहिती ठेवायची आपल्याला घाई होते. कधीतरी-कुठेतरी, कोणाकडून ऐकलेले शेकडो प्रोग्रॅम्स – बहुधा ज्याच्याकडून संगणक घेतलाय त्याच्याकडूनच – आपल्या संगणकावर घालून घेतले जातात. यात आपल्या गरजेचे किती आणि अनावश्यक किती याचा आपण विचारच करत नाही. […]
अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी! […]
एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर… सुखी कोण? हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय… सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर – प्रकाश? भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?… शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं…. खरंय की नाही? […]
नोंव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात वांग्याच्या भरीताला चव असते. जून-जुलैत लागवड केलेली वांगी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये विक्रीसाठी बाजारात येतात. माणसी १ किलो या प्रमाणे घरातील एकूण कुटुंबाला लागतील तितकी वांगी खरेदी केली जातात. त्यासोबत हिरव्या मिरच्या, कांद्याची पात, लसूण, शेंगदाणे हे पदार्थ भरतासाठी लागतात. काड्यांवर किंवा काट्यांवर भाजलेले वांग्याचे भरीत अधिक चविष्ट असते. म्हणून खास भरीतासाठी तुर खाटी किंवा कपाशीच्या कांड्याचे ढीग करुन ठेवले जातात. […]
उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्या खंडोबाची जेजुरी ! खंडोबा हे दैवत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही लोकप्रिय आहे. जेजुरी हे गाव पुण्यापासून अगदी जवळ आहे. या गावातल्या टेकडीवर खंडोबाची दोन ठिकाणी मंदिरं आहेत. पैकी एकाला पठार म्हणतात तर दुसर्याला गडकोट. कर्हेपठार या मंदिराच्या काहीशा वरच्या बाजुला गडकोट आहे. या मंदिराभोवती तटबंदी असल्यामुळे याला गडकोट म्हणतात. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions