बालाकोट सर्जिकल स्ट्राईकची पाच वर्ष
२६ फेब्रुवारी २०१९ पहाटेचे ३.३० वाजले होते. स्थळ होतं पाकिस्तानातील दहशतवादी तळ, पाकिस्तानी हवाई हद्दीत अचानक लढाऊ विमानांचे जोरदार आवाज ऐकू येऊ लागले. सर्व शांत झोपेत होते, एकानंतर एक स्फोटाने हडकंप माजला. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने बदला घेण्यासाठी ऑपरेशन बंदर अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक २ केलं. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. […]