नवीन लेखन...

अभियंता : इमारतीचा शिल्पकार

आपल्या सुंदर व सशक्त कल्पनेतून ऑर्किटेक्ट कागदावर इमारतीचे नकाशे, आराखडे बनवत असतो; व माझीच इमारत लक्षवेधी ठरविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. त्या कल्पनेला सत्यात उतरविण्याचे काम अभियंता करीत असतो. तोच त्या इमारतीचा खरा दिग्दर्शक असतो. […]

‘संकल्प’ आणि संकल्प सिद्धी ?

संकल्प  सिद्धीस जात नाही , अपूर्ण सोडावा लागतो    म्हणून  संकल्पच करायचा नाही  असं मुळीच  नाही . कारण  त्यामुळे  आपण विचार करतो , कृती करतो.  सातत्य आणि नियमितपणा  आपल्या   अंगी  बाणविला  जातो ,  त्यातूनच  आयुष्याला  एक शिस्त , वळण लागते. संकल्प हे  आश्वासन नाही. संकल्प म्हणजे कृतीमागची ‘प्रेरक’ शक्ती. माणसाच्या आयुष्यातील, संकल्प हा स्वनांकडून सत्याकडे नेणारा पूल आहे. […]

अमेरिकेत भेटली आपली झाशीची राणी!

अमेरिकेतील माझ्या वास्तव्यात विविध प्रकारचे वाङ्मय वाचण्याचा माझा प्रयत्न होता. चरित्रात्मक आणि व्यक्तिचित्रणात्मक वाङ्मयप्रकारात मला विशेष रस वाटतो. वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, ग्रंथ आणि पुस्तिका मी चाळत असताना एका पुस्तिकेत मला ‘लक्ष्मीबाई- दि रानी ऑफ झांसी’ हा लेख आढळला. […]

माघी गणेश जयंती

गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस ! […]

सांग ना असावे की नसावे?

सांग ना…..असावे की नसावे? असून नसण्यापेक्षा नसावेच? नसण्यापेक्षा नावापुरते तरी असावे? किती ना हा भावणाकल्लोळ…..!! तुझं वीन झुरावे की तुझ्या साठी? विरहात तुझ्या मरावे की मरून तुला विरहात लोटावे? तुझ्या आसक्तीचा आग्रह की तुझ्याविना विरक्ती ? किती ना ही समभ्रमावस्था……!! तुझ्या बाहुपाशात मोहरावे की स्वतःला चुरगळुन घ्यावे ? तुझ्या प्रीतसागरात डुंबावे की बुडून जावे? आपण साथीने […]

भविष्यातील जहाजे

भविष्यातला, पारंपरिक इंधनाच्या अभावी जहाज वाहतुकीवर होणारा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नवी इंजिने तयार केली जात आहेत. यांतली काही इंजिने ही नव्याने विकसित होत असली तरी काही इंजिनांत पूर्वीच्याच तंत्रज्ञानाचा अधिक कार्यक्षमतेने वापर केला गेला आहे. अशा या विविध प्रकारच्या आधुनिक इंजिनांचा आणि इंधनांचा हा वेध. […]

स्वॅब

सकाळची नीरव शांतता. पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला होता. सहा-सव्वासहा झाले होते. सूर्योदय व्हायचा होता. प्रकाश व अंधाराच्या सीमेवरील तेवढा संधिप्रकाश होता. रस्त्यावर अजूनही तशी वर्दळ नव्हतीच. […]

आयुका आणि चार्ल्स कोरिया

जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांचे अलीकडेच निधन झाले. आयुका या विख्यात संस्थेची वास्तू ही चार्ल्स कोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली. या निमित्ताने आयुकाचे संस्थापक-संचालक प्रा. जयंत नारळीकर यांचा चार्ल्स कोरिया यांच्याशी निकटचा संबंध आला प्रा. नारळीकरांनी लेखणीबद्ध केलेल्या, चार्ल्स कोरिया यांच्या या काही आठवणी. […]

अॅनी ओकली अद्भूत नेमबाज

तसे म्हटले तर जगातील बहुतेक सर्वच स्त्रियांना उपजतच नेमबाजीची कला परमेश्वराने देणगी स्वरुपातच दिलेली आहे. स्त्री सुंदर असो वा नसो, कुणातरी पुरुषाला वा पुरुषांना घायाळ करण्याची शक्ती निसर्गतःच तिच्याजवळ असते. दुष्यंत असो वा विश्वामित्रासारखा ऋषी असो किंवा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो, स्त्रियांजवळील शस्त्राने वय, हुद्दा, प्रतिष्ठा किंवा ध्येय विसरून तो घायाळ होतो. […]

आगीशी झुंजताना

मुंबईत आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात. अग्निशमन दलातील जवान आणि अधिकारी आपला जीव धोक्यात घालून या आगी विझवतात. या विझवताना अनेकदा अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी जखमी तर होतातच पण काही वेळा तर त्यांना प्राणही गमवावे लागतात […]

1 14 15 16 17 18 101
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..