इये ’स्वाहिली’चिये नगरी – ब्रह्मविद्येचा सुकाळू करी
आफ्रिकन काव्यात स्थित्यंतरे चालूच आहेत. हल्लीची गीते, कथानके-कथाकथने, नृत्ये या माध्यमांतून हा बदल दिसून येतो. त्यातच आता नव्या विद्युत् माध्यमांचा प्रभावही पडत आहे. यात गेल्या दहा पंधरा वर्षातील उभरते व विश्र्वव्यापक ‘इंटरनेट’च्या माध्यमात प्रसिध्द होणाऱ्या साहित्याचा या क्रांतीमध्ये सिंहाचा वाटा आहे. ‘वोल सोयिंका’ हे नायजेरियन कवी. बरीच वर्षे त्यांना देशाबाहेर राहावे लागले. स्वातंत्र्यासाठी व लोककल्याणासाठी झगडण्यात […]