बालपणीचे कुतुहल
वाडीतून धूळ उडवत चाललेल्या एस.टी.बसच्या मागे धावण्यात एक वेगळीच मज्जा वाटायची.बालमनाला तो आनंद वाटायचा. आमचं अभेपुरी नजीक पाचपुतेवाडी गाव तसं डोंगराळ भागात वसलेलं, आमच्या अभेपुरी खोऱ्यातील शेवटचं गाव. त्यातच पावसाचं प्रमाण अधिक असल्याने चार महिने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने रस्ते, पूल वाहून जायचे. […]