नवीन लेखन...

लख लख चंदेरी तेजाची आफ्रिका दुनिया

‘आफ्रिकेची सिनेसृष्टी’ म्हणजे मुख्यतः स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेले चित्रपट. या सृष्टीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे ठरले. मात्र वर्षाकाठी शंभराच्या वर मराठी व एकूण बाराशेच्या वर चित्रपट निर्मिती करणारी हिंदी सिनेमासृष्टी आफ्रिकेची ‘रोल मॉडेल’ ठरावी. जगात वर्णद्वेशाचा वणवा पेटलेला असतांना औसमन सेम्बीननी  ‘ब्लॅक गर्ल’ चित्रपट सादर केला. तेव्हापासून आफ्रिकन सिनेमात नव्या अध्यायाला प्रारंभ झाला आणि ते ‘आफ्रिकन […]

भुताचे झाड : सप्तपर्णी वृक्ष

सातवीण किंवा सप्तपर्णी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.सात पर्णदले म्हणजे सात संयुक्त पाने असलेला वृक्ष म्हणून या वृक्ष्याचे नाव सप्तपर्णी किंवा सातवीन. सरळ वाढणारे खोड, लवकर होणारी वाढ आणि फांद्यांची विशिष्ट ठेवण असलेले हे झाड सदाहरित म्हणजेच वर्षभर हिरवेगार राहणारे झाड म्हणून परिचित आहे. […]

मोहीम तलाव पुनरुज्जीवनाची

यशोगाथा सार्वत्रिक व सर्व दूर असायलाच हव्यात.पर्यावरण व प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच काही व्यक्ती स्वतःच्या प्रतिभेचा वापर करून नवनवीन मार्ग व त्यावर उपाय शोधत आहेत.गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक तलावांनी मोकळा श्वास घेतलाय,त्याचबरोबर६३तलावांचे पुनरुज्जीवनही झाले आहे. […]

बस्तर, द नक्सल स्टोरी

सन २०१० छत्तीसगढ मधील बस्तर गावात ७६ जवानांची जाळून केलेली क्रूर हत्या ! ही एक सत्य घटना!! आपल्या वाचनात आलीच असेल . छत्तीसगढ मधील एका साध्या इमारतीत सी आर पी एफ चे जवान विश्रांती घेत आहेत . […]

पाणी

लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही म्हण हनुमंत केंद्रे यांनी प्रत्याक्षात आणली आहे.भगिरथाने प्रयत्नाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली हे आपण पुराणात ऐकले होते. पण दुष्काळी गावाला सुजलाम सुफलाम करण्याची किमया जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमान केंद्रे यांनी केली आहे.दुष्काळ हा काही काही गावासाठी पाचवीला पुजलेला असतो, पण स्वप्नं बघण्याचा आशावादी दृष्टिकोन ठेवला तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठ हनुमान केंद्रे यांनी सिद्ध करून दाखवला आहे. […]

मद्यपान नको मद्यगान करु ! भाग 3

(कांहीं मुक्तक) मद्यपान करुन राखुं मद्य-मान रे मद्यपान करत करत विसरुं भान रे ।। मद्य स्वर्ग, यांस हवें कां प्रमाण रे ? गद्य वदा पद्य वदा, ‘मद्य प्राण रे’  ।। ‘मद्य मद्य’ करुं या  हरपून शुद्ध रे मद्य मिळे वा न मिळे, हेंच युद्ध रे ।। पवित्र-तीर्थ मद्य हें, अतीव शुद्ध रे मद्यपान अधिकारच जन्मसिद्ध रे […]

सरसकट ची झाली कटकट..

आदर्श परिस्थितीत प्रत्येक शैक्षणिक धोरण चांगलेच असते, त्याचा निकाल लावणे हे राबविणारऱ्यांच्या हातात असते. आता सरसकट पास करण्याचे धोरण बंद होणार. केंद्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा साठी शालेय विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

मद्यपान नको मद्यगान करु ! भाग 2

(काहीं मुक्तक) या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं, चला रे पीत बसूं दाखवून चुस्तीफुर्ती, चला रे पीत वसूं ।। मंजूरच साऱ्या शर्ती, चला रे पीत बसूं श्रेष्ठ फक्त इच्छापूर्ती, चला रे पीत बसूं  ।। ही मदिरा चिंताहर्ती, चला रे पीत बसूं ती जीवन-रक्षणकर्ती, चला रे पीत बसूं ।। ती चिरहर्षाची मूर्ती, चला रे पीत बसूं ती नित्य देतसे स्फूर्ती […]

आफ्रिकेतली सौंदर्यवती

आफ्रिकन सुंदरीनी विश्वसुंदरी स्पर्धेत प्रथम विजयश्री प्राप्त केली १९५४ साली. त्यावर्षी इजिप्तच्या अॅंटीगॉनने सुंदरी पद पटकावले. १९५८ ला सादर झालेल्या स्पर्धेत पेनीलोप नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या सुंदरीने चषक पटकावला. १९७४ साली स्पर्धेत नाट्य घडले. हेलन मॉर्गन या ब्रिटीश सुंदरीला मुकुट मिळाला. चार दिवसांनंतर समजले, तिला अठरा महिन्याचा मुलगा होता. ‘आई’ असल्याचे समजल्यावर तिला राजीनामा द्यावा लागला. […]

स्त्रियांची सखी : शतावरी

‘शतावरी’ ही एक उत्तम औषधी वनस्पती असून ती काटेरी झुपकेदार वेल स्वरूपात असते. कडू-गोड चवीची, शीतवीर्य असलेल्या शतावरीची मुळे व पाने औषध म्हणून वापरली जातात. शतावरीचा उपयोग स्त्रियांच्या लैंगिक इच्छाशक्तीत वाढ होणे, बाळंतपणातील अशक्तपणा दूर करण्यासाठी, दूध वृद्धीसाठी व प्रजोत्पादनासाठी होतो. […]

1 2 3 4 5 101
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..