नवीन लेखन...

अत्तराचा फाया

खरंतर लहानपणीच्या खूपशा आठवणी प्रत्येकाला आयुष्यभर पुरतात . त्यात कसा आनंद घ्यायचा ? किंवा त्यातून काय शिकायचे ? हे प्रत्येकाच्या आपापल्या स्वभावावर अवलंबून असते .खूप साऱ्या खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानता येतो .म्हणजे तुम्ही म्हणाल, ‘ हे अल्पसंतुष्ट आहेत काय ? आपल्याला आवडत नाही . […]

सायकल – एक आठवण

रविवारचा दिवस होता. मुलाची सायकल रिपेअरिंग ला घेऊन गेलो. दुकानामध्ये खूपच गर्दी होती. सर्वच्या सर्व सायकल लहान मुलांच्याच रिपेअरिंगला आलेल्या. मोठी सायकल रिपेअरिंगला दिसलीच नाही. लहान्यांच्याच सायकलींची गर्दी होती. वाट पाहण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. […]

वॉशिंग मशीन

वॉशिंग मशिन शिवाय कुठल्याही गृहिणीचे काम चालू शकत नाही. कपडे धुण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. आता त्यात स्वयंचलित, अर्धस्वयंचलित असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचा आकारही आटोपशीर आहे. […]

पर्यटन आणि आरोग्य

पर्यटन प्रवास प्रवास कशासाठी असे विचारले तर पहिले उत्तर कायाकल्प – Rejuvination असेच असेल. रोजच्या कष्टमय कंटाळवाण्या नित्यक्रमातील हा रम्य काळ. […]

अल्पायुषी कडी

शनीची कडी कशी निर्माण झाली असावीत, हा खगोलशास्त्रातील एक चर्चेचा विषय आहे. एका तर्कानुसार या कड्यांची निर्मिती आपल्या ग्रहमालेच्या निर्मितीच्या वेळीच झाली असावी. आपल्या ग्रहमालेतील शनी आणि इतर ग्रह ज्या धुळीच्या आणि वायूच्या मेघातून निर्माण झाले, त्या मेघातूनच ही कडी तयार झाली असावीत. या कड्यांतील पदार्थ म्हणजे पूर्णपणे निर्माण होऊ न शकलेल्या, शनीच्या एखाद्या छोट्या उपग्रहाचे खंड असावेत. […]

बोंगो, ढोलकी आणि मी

माझ्या वडिलांना तबल्याची आवड होती.तरुणपणी त्यांना ते वाजवायला शिकता नाही आले.उस्ताद थिरकवा हे त्यांचे आवडते होते. रेडिओवरील शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ते ऐकत असत.मी लहान असताना मला त्याची गोडी वाटत नव्हती.मी त्यांना मराठी किंवा हिंदी गाण्यांचे कार्यक्रम लावायला सांगायचो. […]

करावे पर्यटन

डॉ. रिमा वीस दिवसानंतर आज पुन्हा क्लिनिकला आली तेव्हा किती वेगळी दिसत होती. एक वेगळाच तजेला तिच्यात दिसत होता. एक वेगळाच उत्साह दिसत होता. त्याच्याआधी पाच-सहा महिने खूपच व्यग्र गेले होते. सतत पेशंट्स बघणे, कधी या क्लिनिक तर कधी त्या क्लिनिकनला जाऊन. […]

हिमनद्यांचा इतिहास

पृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे. […]

हॉटेल आणि आरक्षण

जेव्हा आपण फिरण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चांगल्या ठिकाणी राहणं. आज इंटरनेटच्या माध्यमामुळे Hotels Reservation करणं अत्यंत सोपं झालंय. पण आजही अनेक पर्यटक स्वत: Hotel Rooms त्याचं location पाहिल्याशिवाय बुकिंग्ज करत नाही. जे पर्यटक Tour Operators बरोबर प्रवास करतात त्यांची सगळी सोय त्या कंपनीतर्फे केली जाते. […]

ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग ३

अशा अनेकांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, घडामोडी, चढउतार, गमतीदार आठवणी यांचे सचित्र दर्शन घडवून वाचकांच्या ‘बौद्धिक कक्ष्या’ रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. ‘वाचता वाचता’ पुस्तकाद्वारे एका भव्य सृष्ष्टीचे वाङ्मयीन दर्शन घडवत असतानाच, गोविंदरावांनी आपली ‘बौद्धिक क्षितिजे किती  अमर्याद असू शकतात याचे विहंगम दर्शन घडविले आहे. गोविंदराव तळवलकर यांचा, श्री ह. रा. महाजनींसोबत ‘लोकसत्ता’ संपादक आणि नंतर ‘महाराष्ट्र टाइम्सचे […]

1 53 54 55 56 57 101
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..