नवीन लेखन...

मी पाहिलेली ऊर्जा

अखंड ऊर्जेचे नैसर्गिक वरदानच त्यांना लाभलं होतं जणू! ‘तुझ्यापाशी जे जे  काही आहे ते मुक्त हस्ते समाजाला देत राहा तू,’ असा ईश्वरी संकेत त्यांना मिळाला असावा बहुधा आणि त्यांनी तो आयुष्यभर इमाने-इतबारे पाळला. गोरगरिबांना यथाशक्ती दानधर्मही केला. […]

माझं हार्मोनियम वादनाचं प्रेम

आम्ही हुबळीला होतो तेव्हां मी चौथीत होते.,त्यावेळी शाळेत नुकताच गाण्याचा क्लास सुरु झाला होता..पण पाचवीपासून ,त्यामुळे मला सामील होता आलं नाही. एक मोडक नावाचे शिक्षक होते..मी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत त्यांना जाऊन भेटले आणि मला पेटी शिकवाल का म्हणून विचारले होते..ते ” हो..हो” म्हणाले , पण जेव्हां मी पिच्छा सोडला नाही तेव्हां त्यांनी मला ” सा रे ग म…” वाजवून कोणतं बोट कुठे ठेवायचं वगैरे सांगितलं. […]

समृद्ध शेती, श्रीमंत शेतकरी काल, आज आणि उद्या

शेती आणि शेतकरी देशातील सर्वात महत्त्वाचा घटक जो आपणास कधीही उपाशी ठेवत नाही मित्रहो आज आपण भारतीय शेतीचा इतिहास सुरुवात नवनिर्मिती तंत्रज्ञान प्रगती संशोधन उद्योग व्यवसाय निर्यात पर्यटन आणि बरेच काही  या लेखातून आपण चर्चा करूया. […]

१०० शतके आणि १०० स्वाक्षऱ्या

माझा लागोपाठ ३ ऱ्या वर्षी लिम्का रेकॉर्ड झाला परंतु त्याची तयारी १९९० साली सुरु केली होती. त्या आधी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या जोडीने हॅरिस शिल्ड मध्ये रेकॉर्ड केला तो २४ फेब्रुवारी १९८८ रोजी केला . त्यानंतर दोघांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. कधी मैदानावर तर कधी एखाद्या कार्यक्रमात जेव्हा जेव्हा सचिन तेंडुलकर असे तेव्हा दोन चार स्वाक्षऱ्या घेत असे. पण रेकॉर्ड वगैरे हा प्रकार मनातही नव्हता. […]

स्पोर्टस् टुरिझम

आणखी एक असाच खेळ ज्यासाठी प्रेक्षक वर्षभरात आवर्जून हजेरी लावतात.. तो म्हणजे टेनिस… ह्यातल्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना.. फ्रेंच ओपन टूर्नामेंट, अमेरिकन ओपन टूर्नामेंट, ऑस्ट्रेलियन ओपन टूर्नामेंट आणि सर्वात मानाची म्हणून ओळखली जाणारी विम्बल्डन टेनिस टूर्नामेंट… ह्या ही प्रत्येक स्पर्धसाठी त्यातील होणाऱ्या सर्व सामन्यांना मिळून, पर्यटक लाखाहून अधिक संख्येने उपस्थित राहून खेळातील उत्कंठा कायम ठेवतात. […]

आपला प्रवास खूप छोटा आहे…

मी बसने प्रवास करीत होतो. माझ्या पुढच्या बाजूला एक तरुणी बसलेली होती, तिच्या शेजारची सीट सोडली तर संपूर्ण बस भरलेली होती. पुढच्या स्टाॅपवर एक लठ्ठ स्त्री सामानाने भरलेल्या दोन पिशव्यांसह पुढील दरवाजातून बसमध्ये चढली व त्या मुलीच्या शेजारी रेटून बसली. मी तिला न राहवून विचारले की, ‘तू तिला काहीच कसे बोलली नाहीस?’ तिने स्मितहास्य करुन उत्तर दिले, ‘अनावश्यक वाद घालण्यात काही अर्थ नाही, आपला एकत्र प्रवास हा खूप छोटा आहे. […]

चवीने खाणार त्याला आरोग्य लाभणार!

अम्ल रस हा उत्तम पाचक आहे. त्यामुळे उतारवयात होणाऱ्या मलावष्टंभ व इतर पचनविकारांवर रामबाण. आपल्याकडे पूर्वापार आलं-लिंबू पाचक बनविले जाते ते याचेच उदाहरण. अम्ल रसाची आणखी एक विशेषता म्हणजे, यामुळे एक प्रकारची तरतरी येऊन थकवा दूर होतो. सर्व सरबतं डोळ्यांसमोर आणा, म्हणजे सहज लक्षात येईल. पण याच्या अति सेवनामुळे मात्र स्नायू, यामध्ये शिथिलता येते, तसेच विविध त्वचारोगांचीही उत्पत्ती होते. […]

उपलब्ध पाणी हे कोकण विकासाला सहाय्यक ठरू शकेल काय?

आपल्याजवळ काय नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे, त्याचा आपण आपल्या विकासाठी कसा वापर करू शकतो हे उचित ठरणार नाही का? एक पर्यटनस्थळ निर्माण करणे म्हणजे किमान 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे होय. हा झाला प्रत्यक्ष रोजगार. यापेक्षाही अप्रत्यक्ष रोजगार तर अमाप असतो. […]

क्रुझचा अनोखा अनुभव

हल्ली सर्वजण खूप प्रवास करतात. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही. पुर्वीसारखे परदेशवारीचे अप्रूप आता राहिले नाही. मोठ्या संख्येने मुले-मुली शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी जायला लागले. मग त्यांचे आई-वडील मुलीच्या -सुनेच्या बाळंतपणासाठी अमेरिका युरोपला जायला लागले. […]

चलो, बुलावा आया है…

माणसाच्या जीवनात चढ-उतार हे असतातच. कोण एका वर्षांत करोडपती होतो, तर कधी कुणाच्या धंद्याचं दिवाळं निघतं. शोमन राज कपूरचं तसंच घडलं होतं. ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाने तो खचून गेला होता. […]

1 57 58 59 60 61 101
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..