कोकण रेल्वे : असामान्य आणि अफलातून इंजिनिअरिंग
कोकण रेल्वे हा प्रोजेक्ट भारतासाठी स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा आणि अवघड असा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट होता ह्यात संशय नाही. हा प्रोजेक्ट अनेक खडतर परिश्रमानंतर यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. आज कोकण रेल्वे रोज तीन राज्यातून 741 कि.मी.चा प्रवास करते. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ह्या तीन राज्यांतून जातो. कोकण रेल्वेची हद्द मुंबई जवळील रोहा येथून सुरू होते ते थोकूर ह्या मंगलोर जवळील दक्षिण कर्नाटकमधील रेल्वे स्टेशनला संपते. […]