देखणा निसर्ग आणि लोभस माणसं (ईशान्य भारत)
मी इशान्य भारत. आज तुम्हाला माझ्या घरी नेण्यास आलो आहे. माझ्या सात बहिणी तुमच्या स्वागताला मोठ्या उत्साहाने नटून थटून तयार आहेत. आपल्या महाराष्ट्रात करवीरनिवासींनी महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणूकादेवी व वणीची सप्तशृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. […]