नवीन लेखन...

उपहारगृह, टपरी, आजवर हादडलेली

आज एक चविष्ट विषयाला हात घातलाय. आता याचं काही विशेष वाटत नाही म्हणा, पण माझ्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मध्ये उपहारगृहात जाणं तसं विशेषच होतं. एक तर जेवायला, म्हणजे आजच्या भाषेत lunch अथवा dinner घ्यायला सर्वसामान्य घरातलं कुणी जात नव्हतं. महिन्या दोन महिन्यातून एकदा जाणं व्हायचं, ते ही अल्पोपहारासाठी. मला मात्र आमचे तात्या अधून मधून घेऊन जायचे उपहारगृहात. दादरमध्ये माझ्या आवडीची दोन उपहारगृह होती. त्यातलं एक उडीपी होतं. […]

श्री स्वामी समर्थांच्या हातातील सूर्यमणी

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर मराठी माणसांची मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे. श्री दत्तगुरुंचे अवतार मानले गेलेल श्री स्वामी समर्थ हे अक्कलोट येथे अनेक वर्षे वास्तव्याला होते. या काळात अक्कलकोटचे राजे  श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले  यांची स्वामींवर अपार श्रद्धा बसली. श्री स्वामी समर्थ व श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची पहिली भेट जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरात झाली […]

एका भटक्याने अनुभवलेला अफगाणिस्तान

गेल्या सहा दशकांत अफगाणिस्तानमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. या काळामध्ये ज्या भटक्यांनी अफगाणिस्तानला भेट दिली त्यांनी आपल्याला भावले तसे या देशाबद्दल लिखाण करुन ठेवले आहे. त्यांच्यातलाच एक आहे निक डँझिगर. धाडसी प्रवृतीचा जातिवंत भटक्या पक्षी. १९८२ साली निकला `विन्स्टन चर्चिल फेलोशिप’ मिळाली. या आर्थिक बळावर पुढे निक डँझिगर याने प्राचीन `सिल्क रुट’चा प्रवास करुन त्यातील अनुभवांवर आधारलेले `डँझिगर्स ट्रॅव्हल्स’ हे पुस्तक लिहिले. […]

चि त्र्य खानोलकर – एक अवलिया

चिं.त्र्यं खानोलकर-म्हणजेच चिंतामण त्र्यंबक खानोलकर मराठी साहित्यातील एक अवलिया व्यक्तिमत्व होते. अवलिया म्हणायचे कारण म्हणजे अवलिया जसा आपल्या मस्तीत,धुंदीत जगतो तसे खानोलकर आयुष्यभर जगले. […]

बडोदा वस्तूसंग्रहालय

वस्तुसंग्रहालय म्हणजे ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे ठिकाण होय. ‘वस्तुसंग्रहालय’ या संकल्पनेचा उगम युरोपमध्ये झाला. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रीयामधील टॉलेमी राजाने आपल्या राजवाड्यात पहिल्यांदा वस्तुसंग्रहालय सुरू केले. या राजवाड्यातच अलेक्झांडर द ग्रेट यांचा ग्रंथसंग्रह ठेवण्यात आला होता. परंतु ग्रीक लेखक पॉसॉनियस यांच्या माहितीनुसार इ.स. दुसऱ्या शतकात अथेन्स शहरात एका मोठ्या दालनात काही पेंटिंग्ज सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या. ही प्राचीन काळातील सार्वजनिक वस्तुसंग्रहालयाची सुरुवात होती. […]

मुंबई ते ठाणे रेल्वे – १७१ वर्षे…

हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी मनाचाही वेग मोडी, मग कैची हत्ती घोडी… भारतात आगगाडीच्या आगमनाचे स्वागत करणारी एक कविताच गोविंद नारायण माडगावकर यांनी ‘मुंबईचे वर्णन’ या आपल्या पुस्तकात ‘कटाव’ या शीर्षकाखाली दिली आहे. ब्रिटिशांनी भारतातील आपले साम्राज्य अधिक मजबूत होण्यासाठी तसेच दळणवळण वेगाने होण्यासाठी आगगाडी म्हणजेच रेल्वेचे जाळे विणले. […]

आठवणी

सहज फेसबुक चाळत बसलो होतो. अचानक एका मित्राने ‘ठकठक’ पाक्षिका विषयी केलेली पोस्ट दिसली. ‘दिपू दि ग्रेट’, ‘बन्या’, ‘एश – अभी’ ही सदरे पुन्हा पाहून एखादा खूप जुना मित्र भेटल्या सारखा आनंद झाला. आठवणींच्या घोड्यावर दौडत दौडत मन कधी लहानपणी जाऊन पोहोचले कळलेच नाही. […]

जगप्रसिद्ध लेखक विल्यम सिडनी पोर्टर ऊर्फ ओ’हेनरी

जगामधल्या जर पाच सर्वश्रेष्ठ लघुकथा लेखकांची यादी केली तर ओ’हेनरी याच नाव त्यात आवर्जून घ्यावं लागतं.अवघे सत्तेचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलेला हा लेखक आपल्या कथा लिखाणामुळे इतका अजरामर झालेला आहे की उत्कृष्ट लघु कथा कशी असावी असं जर कोणी विचारलं तर टीकाकार आणि जाणकार समीक्षक एकच उत्तर देतात, लघुकथा फक्त ओ’हेनरी याच्या कथे सारखी असावी. अशी अदभूत मोहिनी त्याने साहित्य विश्वाला घातली होती. […]

कौपिनेश्वर मंदिर, ठाणे

श्री कौपीनेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर ठाणे शहराचे एक भूषण आहे. मासुंदा तलावाच्या पूर्वेला हे मंदिर उभे आहे. मुंबई गॅझेटिअर (ठाणे) पान क्र. ३५४ वर या मंदिराविषयी माहिती मिळते. त्यातील वर्णनाप्रमाणे हे ठाण्यातील सुप्रसिद्ध मंदिर सर्वात मोठ्या म्हणजे चौतिस एकर भूभाग व्यापणाऱ्या ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलावाच्या पूर्वेच्या काठी उभे होते. […]

1 5 6 7 8 9 101
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..