कौपिनेश्वर मंदिर, ठाणे
श्री कौपीनेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर ठाणे शहराचे एक भूषण आहे. मासुंदा तलावाच्या पूर्वेला हे मंदिर उभे आहे. मुंबई गॅझेटिअर (ठाणे) पान क्र. ३५४ वर या मंदिराविषयी माहिती मिळते. त्यातील वर्णनाप्रमाणे हे ठाण्यातील सुप्रसिद्ध मंदिर सर्वात मोठ्या म्हणजे चौतिस एकर भूभाग व्यापणाऱ्या ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलावाच्या पूर्वेच्या काठी उभे होते. […]