नवीन लेखन...

हॉलिवूड चित्रपटात मराठी कलाकारांचा झेंडा

पुण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक श्री समीप कुलकर्णी यांनी चक्क एका हॉलिवूड चित्रपटासाठी सतारवादन केले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पुण्याचेच श्री मिलिंद दाते हे आहेत. […]

एका चित्राची कथा

शनिवारवाड्यातील गणेश महालात इंग्रज व पेशवे यांच्यात १७९० मध्ये ऐतिहासिक तह झाला होता. इंग्रज अधिकारी चार्ल्स मॅलेट आणि सवाई माधवराव पेशवे यांच्यातील या तहाचे हुबेहूब चित्र इंग्रज चित्रकार थॉमस डॅनिअल यांनी या तहानंतर १५ वर्षांनी काढले. विशेष म्हणजे थॉमस डॅनिअल या तहाच्यावेळी पेशव्यांच्या दरबारात उपस्थित नव्हते. तरी त्यांनी काढलेले हे चित्र अजरामर ठरले. याचे कारण थॉमस […]

अद्यावत तंत्रज्ञानाचे विनाशकारी दुष्परिणाम

एटीएम मधून डेंग्यू आणि मलेरियाचे लार्व्हा नोटांसोबत बाहेर येत असल्याचे, भारताच्या राजधानी दिल्ली व परिसरातील झालेल्या सर्वेक्षणात सिध्द झाले आहे.दिल्ली व परिसरात “राष्ट्रीय संक्रामक रोग नियंत्रण विभागाने” ५०० एटीएम यंत्रांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर हे धक्कादायक सत्य उघडकीस आले.
[…]

मोबाईल लाईफस्टाईल

अतिशयोक्ती वाटेल… पण हे काही दिवसात प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे…. आई स्वयंपाकघरात, बाबा हॉलमध्ये, मुलगा त्याच्या खोलीत, ताई कुठेतरी बाहेर, आजोबा-आजी त्यांच्या खोलीत. पण एकमेकांशी गप्पा मारताहेत. चक्क WhatsApp वरुन. प्रत्येक कुटुंबाचा एक स्वत:चा ग्रुप असेल. तसा बर्‍याच कुटुंबांनी आत्ताच बनवलाय. त्या ग्रुपवरुनच आई सांगेल… “चला जेवायला”. बाबा कदाचित चिंटूला विचारतील “अभ्यास झाला का रे बाबा?”. […]

पार्सल टेप आर्ट

काही कलाकार इतके प्रतिभावंत असतात की त्यांना कला साकारण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करुन घेता येतो. चित्रकला ही साधारणपणे कागदावर ब्रशने किंवा इतर माध्यमातून रंगरंगोटी करुन साकारली जाते. मात्र ब्रश किंवा रंगाचा वापर न करता एकाद्याने अप्रतिम चित्रे साकारली तर आपण काय म्हणाल? जगावेगळा आणि प्रसिद्धीपासून दूर असलेला मुळचा युक्रेनमध्ये जन्मलेला आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये वास्तव्याला असलेला […]

जरी सरिताओघ समस्त। परिपूर्ण होऊनि मिळत। …… (ज्ञानेश्वरी, अ.२. ओवी ५८)

संयम व मर्यादा या मोठ्या गोष्टी आहेत. तुमच्या हातात सर्व प्रकारची साधनसामग्री असते, तेव्हा त्या साधनसामग्रीच्या आधारे नवी साधनसामग्री तुमच्या हाती येऊन मिळते, पण तिचा उपयोग व्यक्तिगत व सामुदायिक विकासासाठी करणे महत्वाचे. एक गोष्ट आपल्या नेहमी लक्ष्यात येते ती म्हणजे बर्‍याचदा सत्तेकडे सत्ता जाते व संपत्तीकडे संपत्ती; पण सत्तेमुळे उर्मट होऊ नये व संपत्तीमुळे माजू नये. […]

का चिंतामणी जालिया हाती। सदा विजयवृत्ति मनोरथीं। ……. ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी २२

गुरू अनेक प्रकारचे असतात व ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी उभे असतात. आपण घेतलेल्या श्वासाच्या पहिल्या क्षणी आपल्याला, आपला पहिला गुरू भेटतो- मातृगुरू! आपली आई. आई श्वास घ्यायला शिकवते, बोलायला शब्द देते, जगण्याची मूल्ये देते.
[…]

आपला कपालेश्वर !

कर्जतमध्ये मूल जन्माला आलं की त्याची पहिली ओळख होते ती त्याच्या आई-बाबांशी आणि दुसरी ओळख होते कपालेश्वराशी! कर्जतकरांची तशी श्रद्धाच आहे – बाळाला कपालेश्वराच्या पायाशी ठेवला की ते दीर्घायुषी होते. […]

कमी वजनातील फॉर्मिंग दागिन्यांची जादु ……

श्रावण महिना लवकरच सुरु होईल. सणासुदीच्या या दिवसात सोन्याचे दागिने घालून मिरवणे हे ओघानेच आले. मुंबई-पुण्यातल्या असुरक्षित जीवनात खर्‍या सोन्याचे दागिने घालून प्रवास करणेही कठीण झाले आहे. सोन्याच्या किमतीही आता आकाशाला भिडायला लागल्या आहेत. त्यामुळे अस्सल सोन्याचे दागिने घालण्यावर मर्यादा आल्या आहेत. बदलत्या काळाची गरज ठरलेले, कलाकुसर, नावीन्य, सुरक्षितता, हौस आणि कमी वजनातील २४ कॅरेट सोन्याचे […]

1 81 82 83 84 85 101
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..