नवीन लेखन...

आधुनिक युगाचा विश्वकर्मा : नितीन चंद्रकांत देसाई

काही पुस्तके देखणी दिसतात, पण त्यात आशयघनता नसते. काही पुस्तके आशयघन असतात पण त्यांच्यात देखणेपणा नसतो. मराठी साहित्याच्या प्रांतात तर ही स्थिती नेहमीच आढळते. परंतु, ही उणीव दूर करणारे एक नवे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे, ते म्हणजे ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’, लेखक मंदार जोशी. […]

पळसाच्या पानाची पत्रावळ आता विस्मरणातच….

राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती. जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह’ हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची […]

भारतीय खाद्यसंस्कृती

कोणत्याही देशाची सांस्कृतिक उत्क्रान्ती कशी झाली हे पाहताना तिथल्या समाजाच्या अन्नांबद्दलच्या कल्पना आणि अन्नपदार्थ बनविण्यासंबंधीच्या कल्पना कशा आणि का बदलल्या गेल्या हे बघणं अत्यंत महत्वावं आणि मनोरंजकही असतं. आपल्या देशासारखा भला मोठा इतिहास असलेल्या देशाच्या बाबतीत तर ते आवश्यकही असतं. […]

साबुदाणा – समज आणि गैरसमज !!

चातुर्मास सुरु झालाय आणि सहाजिकच उपवासाचे दिवसही. आषाढी एकादशीही आली.  महाराष्ट्रात लाखो लोकांचा हा उपवासाचा दिवस. “एकादशी- दुप्पट खाशी” असा वाक्प्रचार या आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रचलित झालाय. कारण सहाजिकच आहे. या दिवशी बर्‍याच लोकांच्या उपवासाच्या थाळीमध्ये अनेक सुग्रास खाद्यपदार्थ असतात. बटाट्याचा किंवा रताळ्याचा कीस, शिंगाड्याचा शीरा, उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ, राजगिर्‍याच्या पुर्‍या आणि अर्थातच साबुदाण्याची खीर किंवा खिचडी ! […]

“गावाकडची अमेरिका”च्या निमित्ताने……

“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याच्या या प्रयत्नातील हे पहिले पुस्तक….. “गावाकडची अमेरिका”. आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्‍या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल… “मराठीसृष्टी”च्या माध्यमातून “गावाकडची अमेरिका” हे एका अत्यंत वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे इ-बुक सुद्धा प्रकाशित केले. हे पुस्तक आता वेबसाईटवर “क्रमश:” च्या […]

दख्खनची राणी आणि धावते उपाहारगृह !

सकाळी पुणे ते मुंबई आणि संध्याकाळी परत पुणे असा प्रवास करणार्‍यांची संख्या फार मोठी आहे. गेली कित्येक वर्षे अनेकजण असा प्रवास करत आहेत. सहाजिकच हा प्रवास होतो रेल्वेने…… हे रेल्वेप्रवासी एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकमेकांशी जिव्हाळ्याचं नातं ठेउन आहेत. या नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या मनात दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन या गाडीबद्दल प्रचंड आत्मियता आहे. मध्य रेल्वेवरील ही […]

बोलघेवड्यांची दुनिया

बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अटलबिहारी बाजपेयी वगैरेंसारखी माणसं बोलायला लागली की समोरचा जनसमुदाय कान टवकारुन ऐकत रहातो, अक्षरश: मंत्रमुग्ध होतो. या मंडळींच्या बोलण्यात एकप्रकारची जादू असते. […]

छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारतीला जागतिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. १२५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीचं नाव १९९६ मध्ये `छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असं ठेवलं गेलं. मात्र दुर्दैवाची गोष्टी अशी की सगळीकडे संक्षिप्तनावे म्हणजेच Shrotform वापरण्याच्या सध्याच्या दिवसात या स्थानकाला `छशिट’ असं संबोधलं जावू लागलंय. […]

बळीराजा की बळीचा बकरा?

भारतासारख्या “कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणार्‍या” देशात आज शेतकर्‍यांची जी भयानक अवस्था “मायबाप सरकार” नावाच्या व्यवस्थेने करुन ठेवली आहे त्यामुळे त्याला थेट आत्महत्येचाच मार्ग अवलंबायला लागला आहे. भारत “कृषीप्रधान” वगैरे असता तर आज शेतकरी राजासारखा राहिला असता. मात्र या “कृषीप्रधान” देशाची अवस्था गेल्या काही वर्षात “दलालप्रधान” करुन ठेवण्यात आमच्या राज्यकर्त्यांचा मोलाचा हातभार आहे. […]

1 82 83 84 85 86 101
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..