पेट्रोलियम: खनिज तेले
हायड्रोजन आणि कार्बन या मूलद्रव्यांचे अणू संयोग पावून ‘हायड्रोकार्बन’ रसायने तयार होतात. नाना तऱ्हेच्या हायड्रोकार्बन्स रसायनांची संख्या प्रचंड असून त्यांच्यापासून रसायन शास्त्रात एक वेगळा विभाग तयार. होतो. पेट्रोलियम पदार्थ हे या भिन्न हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणांनी बनलेले असतात. त्या संयुगातील कार्बनची संख्या जेवढी जास्त त्यावरून त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांची वर्गवारी केली जाते. […]