नॅफ्था
नॅफ्था हे पेट्रोलियम द्रावण साधारणपणे ३० ते १७० अंश सेल्सिअसला ऊर्ध्वपातित होते. खते व पेट्रोरसायने तयार करण्यासाठी इंधन आणि कच्चामाल म्हणून नॅफ्थाचा प्रामुख्याने वापर होतो. नॅफ्थामध्ये पॅराफिनिक, नॅपशॅनिक आणि एरोमॅटिक रसायनांचा समावेश होतो. दोन प्रकारच्या नॅफ्थाची निर्मिती होत असते. एरोमॅटिक अंश जादा असलेल्या नॅफ्थाला ‘हाय एरोमॅटिक (एच.ए.एन.) आणि कमी एरोमॅटिक अंश नॅपथा’ असलेल्या या द्रावणाला ‘लो एरोमॅटिक नॅफ्था’ असे (एल.ए.एन.) संबोधिले जाते. […]