व्हाइट स्पिरिट
मिनरल टर्पेन्टाइन हे ‘व्हाइट स्पिरिट’ (स्वच्छ, पारदर्शक द्रावण) वर्गातले द्रावण असून ते १४५ ते २०५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान उकळते. रंग, वार्निश, लेकर्स यांचे पृष्ठीय थर (सरफेस कोटिंग) देण्यासाठी हे द्रावण मोठ्या प्रमाणात वापरतात. या द्रावणात असलेल्या एरोमेटिक हायड्रोकार्बन्सच्या अंशामुळे त्याची द्रावणीयता वाढीव स्वरूपाची असते. त्याची ही द्रावणीयता व हळुवार उडून जाण्याची क्षमता यांच्या समतोलपणामुळे समप्रमाणात कोटिंग करताना खूप फायदा होतो. […]