नवीन लेखन...

वॉटर हीटर (सोलर)

भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्याने आपल्याकडे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकीचे दिवस सूर्यप्रकाश असतो. सहस्ररश्मी सूर्याची फुकट मिळणारी ऊर्जा वापरणे हा खरेतर इंधन टंचाईवरचा एक पर्याय आहे. पाणी तापवण्यासाठी आपण घरातील किमान २५ टक्के ऊर्जा खर्च करीत असतो ती वाचवता आली तर विजेचा किंवा गॅसचा वापर टाळल्याने प्रदूषण होणार नाही. […]

ग्लुकोज मीटर

मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय उपकरण वापरले जाते त्याला ग्लुकोज मीटर असे म्हणतात. […]

कॉर्डलेस फोन

कॉर्डलेस फोन हा वापरण्यास अगदी सोपा असतो. रिसिव्हरच आपल्याजवळ असल्याने चटकन योग्य तो संदेश दोन व्यक्तींमध्ये पोहोचवता येतो. यात वायरींचे जंजाळ नसते हे त्याचे वैशिष्ट्य. काही कंपन्यांमध्ये अजूनही अंतर्गत संदेशवहनासाठी अशा प्रकारचे कॉर्डलेस फोन वापरले जातात. […]

गणकयंत्र

आजच्या संगणकाच्या युगातही आकडेमोडीसाठी कॅलक्युलेटर हे साधन वापरले जातेच. आता संगणकावर, घड्याळात, मोबाइलमध्ये कॅलक्युलेटर आहे. लॅटिनमधील कॅलक्युलेअर म्हणजे दगडांच्या मदतीने मोजणी, यावरून कॅलक्युलेटर शब्द तयार झाला. पूर्वीच्या काळी आपल्याकडे अर्ध्या भागात रंगीत मणी लावलेली पाटी होती, तिच्यात जी खुबी होती त्याचाच वापर करीत गणनाची संकल्पना प्रगत झाली. […]

एअर कंडिशनर

एअर कंडिशनर म्हणजे वातानुकूलन यंत्र हे रेफ्रिजरेटरसारखेच काम करते. एका ठिकाणची उष्णता शोषून ती दुसरीकडे नेऊन सोडते. […]

वॉशिंग मशीन

वॉशिंग मशिन शिवाय कुठल्याही गृहिणीचे काम चालू शकत नाही. कपडे धुण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. आता त्यात स्वयंचलित, अर्धस्वयंचलित असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचा आकारही आटोपशीर आहे. […]

व्हॅक्यूम क्लिनर

धूळ हा आजच्या काळात एक डोकेदुखीचा मुद्दा होऊन बसला आहे, धुळीमुळे आपल्याला श्वसनाचे आजार जडतात त्यामुळे त्यापासून रक्षण करणे गरजेचे असते. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही नाजूक असतात ती धुळीमुळे खराब होतात अशा ठिकाणीही व्हॅक्यूम क्लीनरचा वापर केला जातो. […]

थर्मास फ्लास्क

थर्मास फ्लास्क म्हणजेच व्हॅक्यूम फ्लास्कचा उपयोग आपल्याला कुठल्याही द्रवाचे तपमान आहे ते राखले जाते. थंड पेय त्यात ठेवले तर थंड राहते गरम ठेवले तर गरम राहते. […]

फूड प्रोसेसर

विसाव्या शतकात स्वयंपाकघरातील मिक्सरची जागा फूड प्रोसेसरने घेतली. मिक्सरच्या मदतीने काही कामे जरूर करता येतात पण त्याला मर्यादा आहेत. त्यामुळेच पीठ मळणे, भाज्यांच्या चकत्या करणे, काही फळभाज्या किसणे, फळांचा ज्यूस करणे अशी अनेक कामे करणारे वेगवेगळ्या भांड्यांचे जोड असलेले एकच उपकरण असावे यातून फूड प्रोसेसर (अन्न संस्कारक) तयार करण्यात आला. […]

इंडक्शन कुकर

इंडक्शन कुकरमध्ये भांडेच हिटिंग एलमेंटचे काम करते. सोप्या शब्दांत भांडेच अन्न शिजण्यासाठी लागणारी उष्णता निर्माण करण्याचे काम करते. यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे तत्त्व वापरलेले असते. […]

1 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..