Arthavedh
सॅटेलाईट रेडिओ
सॅटेलाईट रेडिओ’ ही संकल्पना तुलनेने खूपच अलीकडची आहे. त्याला डिजिटल रेडिओ असेही म्हटले जाते. यात डिजिटल सिग्नल हे उपग्रहामार्फत रिले केले जातात व ते आपल्या विशिष्ट प्रकारच्या रिसिव्हरपर्यंत म्हणजे रेडिओपर्यंत पोहोचतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय मोठ्या भौगोलिक प्रदेशात हे कार्यक्रम अतिशय स्पष्टपणे ऐकता येतात. […]
सॅटेलाईट फोन
सॅटेलाईट फोन हा एक प्रकारचा मोबाईल फोनच असतो, पण तो सेल साईट्सच्या ऐवजी उपग्रहांना जोडलेला असतो. त्याच्या मदतीने आपण नेहमीचे फोन कॉल्स करू शकतो, शिवाय एसएमएस व कमी तरंगलांबीवर आधारित इंटरनेट अशा सेवा त्यावर उपलब्ध आहेत. […]
सिमकार्ड
सध्या मोबाईलच्या वापरात भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साधनाने अप्रत्यक्षपणे अनेकांना रोजगारही मिळवून दिला आहे. मोबाईल म्हटले की, ज्याच्या त्याच्या तोंडी एक शब्द नेहमी असतो तो म्हणजे सिमकार्ड. सिमकार्ड याचा अर्थ सबस्क्रायबर आयडेंटिटी मोड्युल. ही एक प्रकारची मेमरी चिप असते. […]
स्मार्टफोन
सेलफोन हा केवळ बोलण्यासाठी कामाचा होता, त्यामुळे त्याच्या उपयुक्ततेला मर्यादा होत्या. त्यातूनच हातात मोबाईलसारखेच यंत्र असेल पण त्यावर ईमेल, फोन कॉल्स, घड्याळ, नोट पॅड अशा अनेक सुविधा देता आल्या तर बरे होईल, या विचारातून स्मार्टफोन ही संकल्पना पुढे आली. […]
मोबाईल (सेलफोन)
मोबाईल फोन म्हणजे सेलफोन. यात मोबाईल हे नाव अशासाठी की, आपण कुठेही असलो तरी मोबाईलवर बोलू शकतो म्हणून आणि सेलफोन अशासाठी की, मोबाईल फोनच्या कार्यासाठी कुठल्याही महानगराचे काही विभाग पाडतात त्यांना सेल म्हणतात. […]
फोर जी तंत्रज्ञान
फोर जी हे अत्याधुनिक असे तंत्रज्ञान असून त्याचा अर्थ फोर्थ जनरेशन वायरलेस असा आहे. वायरलेसची ती चौथी आवृत्ती आहे असे म्हणायला हरकत नाही. थ्री-जी पेक्षा प्रगत असे हे तंत्रज्ञान असून त्यात पूर्वीच्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक वेगाने माहितीची देवाणघेवाण करता येते. केव्हाही व कुठेही अतिशय स्पष्टपणे व्हिडिओ पाहता येते. त्यामुळेच त्याला मॅजिक टेक्नॉलॉजी (मोबाईल मल्टिमीडिया एनीटाईम एनीव्हेअर) असेही […]