किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]
पिढी गेली रूढी बदलली, बदलून गेले सारे क्षणा क्षणाला बदलून जाते, मन चकित करणारे….१, सुवर्णाचे दाग दागीने, हिरे माणके त्यात पिढ्यान पिढ्याचे मोल राहती, श्रीमंतीचा थाट….२, चमचम आली तेज वाढले, नक्षीदार होवूनी फसवे ठरले आजकालचे, क्षणक जीवन असुनी….३, हासणारी ती फुले बघीतली, आणिक इंद्र धनुष्य नक्कल करता निसर्ग कलेची, दिसे त्यात ईश….४, ओबड धोबड बटबटती ते, […]
प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ //धृ// बागेमधल्या फुलानीं सुगंध आणिला वनीं फुलपाखरासमान गंधशोषित जाऊ //१// प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ कोकिळ गाते आम्रवनीं कुहू ss कुहू ss स्वर काढूनी नक्कल करण्या तिची उंच लकेरी घेऊं //२// प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ श्रावणाच्या पडती सरी अंग भिजते थोडे परि सप्तरंगाचे इंद्रधनुष्य आकाशांत पाहूं //३// प्रेमिकांचे गीत गाऊं […]
सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी….१, भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा, काळाची ती भूक असूनी, माहीत असते सर्वांना….२, अविरत चालू लपंडाव , जगण्या मरण्याचा शेवट हा जरी निश्चीत असला, हक्क तुम्हां खेळण्याचा….३, खेळती काही तन्मयतेने, रिझविती इतरजणां, खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां….४ — डॉ. भगवान […]
धागा धागा विणून, केली तयार जाळी गोलाकार नि बहुकोनी घरे, पडली निर निराळी….१, स्थिर सुबक घरे, जसा स्थितप्रज्ञ वाटे सर्व दिशांचा तणाव, न दिसे कुणा कोठे….२, तुटेल फूटेल तरी, सैलपणा येणे नाही जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही….३, जगे तो अभिमानानें, मान ठेवूनीया ताठ संसारामधील क्लेश, झेलीत होती त्याची पाठ….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
रंग बदलले ढंग बदलले, साऱ्या जीवनाचे बदलणाऱ्या परिस्थितीने, तत्व शिकवले जगण्याचे….१, कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं आनंदे….२, धुंदीमध्यें असता एका, अर्थ न कळला जीवनाचा आले संकट दाखवूनी देयी, खरा हेतू जगण्याचा….३, दु:खामध्ये होरपळून जाता, धावलो इतरांपाठीं अनेक दु:खे दिसून येता, झालो अतिशय कष्टी….४, दु:ख आपले निवारण्याते, आनंद वाटे मनीं इतर […]