एके काळीं हवे होते, मजलाच सारे कांहीं आज दुजाला मिळतां आनंद मनास होई माझ्यातील ‘मी ‘ पणानें विसरलो सारे जग तुझ्यामध्येंही ‘ मी ‘ आहे, जाण येई कशी मग जेंव्हा उलगडा झाला साऱ्या मध्ये असतो ‘मी’ आदर वाटू लागला, जाणता ‘अहं ब्रह्मास्मि‘ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे? निसर्गाच्या ठेव्या मधल्या, सर्व वस्तू सुखदायीं निवडून घे तूं त्यातील, आनंद देतील काहीं केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य मनाचा हा खेळ जहाला, सुख दुःख समजणें निसर्ग प्रयत्न करितो, सदैव सुख देत जाणें — डॉ. […]
चाललो होतो मित्रासह सहल करण्या एके दिनीं आनंदाच्या जल्लोषात आम्हीं गात होतो सुंदर गाणीं १ वेगामध्यें चालली असतां आमची गाडी एका दिशेने लक्ष्य आमचे खेचले गेले अवचित एका घटनेने २ चपळाईनें चालला होता काळसर्प तो रस्त्यातूनी क्षणांत त्याचे तुकडे झाले रस्त्यावरी पडला मरूनी ३ काय झाले कुणास ठाऊक सर्व मंडळी हळहळली जीव घेणाऱ्या […]
मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन शेषशायीचे चित्र बघतां, साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल शेषापरी वेटोळे असुनी, ‘ नाळ ‘ तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें, बालक ते निद्रिस्त असती बालकाच्या नाभी मधुनी, येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी, ब्रह्मापरी दिसे अंग ‘ सो हं ‘ निनादुनी सांगे, ‘ मीच तोच […]
प्रेम-स्वभाव असे ईश्वरी गुण मनीं ठसला हा आत्म्यांत राहून प्रेम करावे वाटे आंतरिक ही ओढ ज्याची मुळे खोल पडने अवघड आपसांतील प्रेम आत्म्यातील नाते न दिसता देखील बांधलेले असते सर्व जीवाविषयीं सहानुभूती भासे ह्रदयामध्ये ती सुप्तावस्थेत दिसे आमचे राग लोभ बाह्य संबंधामुळें षडरिपू विकार शारीरिक सगळे वाईट गुणधर्म देहाशीं निगडीत चांगले जे कर्म आंतरीक इच्छेत राग […]
पूर्णपणें मज पटले आतां कविता कुणी करवून घेतो कोण असेल तो माहित नाहीं मजकडून तो लिहून घेतो घ्यानी मनीं कांहींही नसतां विषय एकदम समोर येतो भाव तयांचे जागृत होऊन शब्द फुले ती गुंफून जातो एका शब्दानंतर दुसरे आणि तिसरे, लगेच चौथे शब्दांची ती भरुनी ओंजळ माझ्या पदरीं कुणी टाकतो गुंफण करुनी हार बनता त्याजकडे मी बघत […]
गम्मत वाटली प्रथम मजला बहिरा ऐके कीर्तन अश्रू वाहू लागले माझे नयनी भाव त्याचे जाणून नियमित येई प्रभूचे मंदिरी श्रवण करी कीर्तन केवळ बघुनि वातावरण ते तल्लीनच होई मन सतत टिपत होते मन त्याचे इतर मनांचे भाव केवळ जाणण्या भगवंताला डोळे आतुर सदैव रोम रोमातून शिरत होत्या प्रभू निनाद लहरी संदेश प्रभूचा पोह्चूनी आत्म्यास जागृत करी होऊन गेला प्रभूमय बहिरा धुंद त्या वातावरणी ऐकत […]
भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा जानकीस पळवून नेई, विरोध करण्यास प्रभुचा झाली इसतां आकाशवाणी, कंसास सांगून मृत्यु त्याचा तुटून पडता देवकीवरी, नाश करण्या त्याच प्रभुचा प्रभी अवताराचे ज्ञान होते, परि विरोध करीत राही होऊन गेले तेच प्रभूमय, सतत त्याचाच […]
कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे १ ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे २ माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे ३ आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी हीच फळे असंख्य […]
रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी //धृ// काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज चमके नयनीं ओढ लागतां शरिरीं //१// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी कंठी माळा चमकती मोर पिसे टोपावरती पायीं नुपुरे घालूनी नाचतो ताल धरुनी हातांत त्याच्या बासरी //२// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं […]