एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ// ऐष आरामांत राहून देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती नाना खटपटी आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //१// मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार […]
मजेदार वाटत असती, भावंडांची बघून भांडणें ‘मला पाहीजे जास्त’, हेच मुख्य मागणें इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी, रागव्यक्त होणार क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे, शत्रु येथे नसे कुणी बालपणीच्या […]
बीज – वृक्षाचे चक्र कुणाचे ? सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला, घडते मग कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत […]
विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच लक्ष्य खेचले जातां विचार नसतो […]
करुनी दयेची बरसात पावन करीतो दुष्टाला तुझ्या मनाचा ठाव उमजला नाहीं कुणाला वाल्या होता खूनी पापांनी भरले रांजण परि तुझ्या दयेद्वारे गेला तो उद्धरुन कालीदास होता ऐष आरामी राहात होता वेश्येघरीं महाकवी बनवूनी त्याला किमया तूंच करी बहकला होता पुंडलीक पत्नीच्या विपरीत नादानें उभे केले तुला विटेवरी आईबाप सेवा शक्तिनें क्षमा करुनी पाप्यांना पावन तूं करितो […]
धन्य ती महाराष्ट्र माऊली अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली //धृ// ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली //१// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली […]
ठेवून पाऊल चंद्रावरी अभिमान तुला वाटला मान उंचावूनी आपुली वर्णन करीता झाला ।।१।। चंद्र आहे ओबड धोबड तेथे सारे खडकाळ असे झाडे झुडपे पशु पक्षी हवा पाणी कांही नसे ।।२।। नमुने आणले दगड मातीचे चंद्रावरी तू जाऊन शुष्क आहे वातावरण असेच केले वर्णन ।।३।। बघितले बाह्य रूप ह्या रजनीकांताचे थोटका पडलास तू शोध घेण्या अंतरीचे ।।४।। […]
थांबव गंगा यमुना मुली आपल्या नयनातल्या हंसण्यात जन्म घातला मग ह्या कोठूनी आल्या ? // हांसत गेले जीवन तुझे फूलपाखरा परी तसेच जाईल भविष्यातें आशिर्वाद देतो शिरीं // समजतील दुःखी तुजला नसता तो तुझा स्वभाव हासून खेळून आनंदाने फूलवित रहा भाव // जाणून घे स्वभाव सर्वांचे रमुन जा संसारी चाली रितीचे पालन करावे तुझ्याच नव्या घरी […]
हांसत आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश स्पर्शुनी चरणाला केली उधळण सुवर्णांची तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते सूर्याचे रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन स्रष्टीवर किरणे उधळतो कोटी कोटी किरणांनी तो देवीची पूजा करितो केवळ त्याची पूजा बघुनी मनी पावन मी होतो डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com