नवीन लेखन...

मराठीसृष्टीचे लेखक डॉ. भगवान नागापूरकर यांच्या कवितांचा हा संग्रह.

प्राणीमात्रा विषयी दया

चाललो होतो मित्रासह सहल करण्या एके दिनीं आनंदाच्या जल्लोषात आम्हीं गात होतो सुंदर गाणीं १ वेगामध्यें चालली असतां आमची गाडी एका दिशेने लक्ष्य आमचे खेचले गेले अवचित एका घटनेने २ चपळाईनें चालला होता काळसर्प तो रस्त्यातूनी क्षणांत त्याचे तुकडे झाले रस्त्यावरी पडला मरूनी ३ काय झाले कुणास ठाऊक सर्व मंडळी हळहळली जीव घेणाऱ्या प्राण्यालाही सहानुभूती ती […]

तुझे तुलाच अर्पण !

तुझेच घेऊनी तुलाच द्यावे, भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे, तुझीच असतां सृष्टी सगळी वाहणाऱ्या संथ नदीतील, पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील, गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी, नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी, ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं, साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद, हाच मिळवित […]

क्रौंच पक्षाला मुजरा

पौराणिक कथा सांगते. क्रौंच पक्षाची जोडी रासक्रिडा करीत असता, निषादाने नेम साधला व एकास घायाळ केले. तो तडपडू लागला. जवळून त्याच वेळी महान ऋषी वाल्मिकी जात होते. ते करुण दृष्य बघतांच त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पद्य रुपातले होते. ” मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम् ” (जगातले तेच प्रथम […]

कविता स्फूर्ति

पूर्णपणें मज पटले आतां कविता कुणी करवून घेतो कोण असेल तो माहित नाहीं मजकडून तो लिहून घेतो घ्यानी मनीं कांहींही नसतां विषय एकदम समोर येतो भाव तयांचे जागृत होऊन शब्द फुले ती गुंफून जातो एका शब्दानंतर दुसरे आणि तिसरे, लगेच चौथे शब्दांची ती भरुनी ओंजळ माझ्या पदरीं कुणी टाकतो गुंफण करुनी हार बनता त्याजकडे मी बघत […]

निसर्ग सुख!

आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे? निसर्गाच्या ठेव्या मधल्या, सर्व वस्तू सुखदायीं निवडून घे तूं त्यातील, आनंद देतील काहीं केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य मनाचा हा खेळ जहाला, सुख दुःख समजणें निसर्ग प्रयत्न करितो, सदैव सुख देत जाणें डॉ. भगवान […]

पेराल तसे उगवते

रुजविता बियाणें    अंकूर फुटती असतील दाणे जसे    तेच उगवती पेरता आनंद      आनंदचि मिळे प्रेमाची बियाणें    प्रेम आणी सगळे शिवीगाळ करुनी    आदर येई कसा शत्रुत्त्वासंगे नसे     मैत्रीचा ठसा घृणा दाखवूनी      कसे येई प्रेम क्रोधाच्या मोलाचे   शांती नसे दाम पेरावे तसें उगवतें    नियम हा निसर्गाचा सुख दुःखाला कारण   स्वभाव ज्याचा त्याचा   –डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

बाळकृष्ण

रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी //धृ// काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज चमके नयनीं ओढ लागतां शरिरीं //१// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी कंठी माळा चमकती मोर पिसे टोपावरती पायीं नुपुरे घालूनी नाचतो ताल धरुनी हातांत त्याच्या बासरी //२// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं […]

1 12 13 14 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..