खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार । शिकला सवरला परि न जाणला संसार ।। पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी । घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी ।। वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता । कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता ।। सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची । श्रेष्ठ पदीचा […]
सामान्यांतूनी असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे, कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे…..१, उदार होवूनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा, परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा……२, जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा……३, जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी….४, निर्जीव सजीव […]
जीवन होते गर्दी मधले, मुंबापुरीचे त्याचे, खडतर असती मार्ग सारे, येथील जगण्याचे…१, दिवस होता त्याचेसाठी, तारेवरची कसरत धावपळ करीत असता, सावध ठेवी चित्त….२, जाण होती एकची त्याला, मृत्यू आहे स्वस्त इथे सज्ज राही सदैव मनी, स्वागत करण्या त्याते….३, ठेवीत होता धन थोडेसे, स्वत:चे जवळी, उपयोगी ते पडेल केंव्हां, येत्या संकटकाळी….४, लिहून ठेवीले पत्र एक ते, त्याने खिशामाजी […]
एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विणा । काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा ।। १ शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं । कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी ।। २ उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती । शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती ।। ३ मार्गदर्शक तो भेटत नाही, […]
हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला विसरावी मी ओढ येथली, जाता सासरला…. ।। धृ ।। खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी, पंखांना परि शक्ती देवूनी, सांग मला ग घेण्या भरारी सैल कर तू पाश आपला…१, हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला, संसारातील धडे देवूनी, केलीस तयार कष्ट घेवूनी कुठे लोपला आज विश्वास तो, […]
जीवन गंगा वहाते , फुलवित सारी जीवने । पडेल प्रवाहीं कुणी, लागते त्याला वाहणे ।।१।। काही काळ वाहतो देह, डुबून जाणे अंतीम, कसा वाहतो केंव्हा डुबतो, प्रवाही वेगाचे हे काम ।।२।। बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती । वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होऊन काठी राहती ।।३।। देह क्षणाचा जरी, कर्मे राहती […]
लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे । आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे ।। जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे । मरण नसता आपले हाती, जगणे हे आले ।। लुळा असला देह जरी, मन सुदृढ होतेस । जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते ।। गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे । नभास भिडता सुरताना, शब्द […]
लीन दिन ती होवून पुढती, झुकली होती त्यावेळी । हात पुढे आणि नजर खालती, ज्यांत दिसे करूणा सगळी ।। लाचार बनूनी पोटासाठी, हिंडे वणवण उन्हांत सारी । वादळ वारा आणिक पाऊस, संगत घेवून फिरे बिचारी ।। मदतीचा हात दिसे, जागृत होता भूतदया । जनसामान्यात असती मानवतेतील ही माया ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी…१, बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे…२, नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे…३, जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी…४, प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची….५, मृत्यूच्या दाढे मधूनी, एक […]
चिव चिव करीत, एक चिमणी आली । दर्पणाच्या चौकटीवरती, येवून ती बसली ।। १ बघूनी दूजी चिमणी दर्पणी, चकीत झाली होती । वाटूं लागले या चिमणीला, आंत अडकली ती ।।२ उत्सुकता नि तगमग दिसे, चेहऱ्यावरी । चारी दिशेने बघत होती, आंतल्या चिमणी परी ।।३ औत्सुक्याचे भाव सारे दिसती, आतील चिमणीतही । कशी करूं तिची बंधन मुक्ती, […]