दोन रिळाचे दोन धागे, एकत्र ते आले एकमेकांत दोन्हीही, गुंफून परि गेले….१, गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा शक्य होईल कसे आता, वेगळे होण्याचा….२, खेच बसता वाढत गेला, होता गुंता उकलून सुटणे शक्य नव्हते, त्याला आता…..३, दोनच पर्याय होते, त्याचे पुढती तुटणे वा एकत्र राहणे, ह्या जगती….४, वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे अवशेष राहतील परि […]
प्रफुल्लित भाव वदनी, घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या, आज त्याच्या मनांत कांहीं…१ खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें, हीच तयाची जीवन अंगे…२ सांज होता काळोख येवूनी, निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं, कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या आधीन होतां, निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या दिवसा विषयी, अजाण होता […]
कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते….१ देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले….२ देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी…३ जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई सबळ दुर्बल याचा संघर्ष, टळत नेहमी जाई….१, मर्दूमकीचा विचार ठेवूनी, मैदानी उतरी त्याच स्थरावर सारे घडते, मुरले जे शरिरी….२, ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी हात घाईची सिमा परि, तो टाळी विचारांनी…..३, मस्तावले शरिर असतां, धक्का-बुक्की होते देहामधली जमली शक्ती, बाह्य मार्ग शोधते….४, दिसून येतो ऊर्जा वापर, देह […]
भरवशाची घेऊन शिदोरी, पाऊलवाट चालत होता । कुणीतरी आहे मार्गदर्शक, यापरी अजाण होता ।। १ बरसत होती दया त्याची, जात असता एक मार्गानी । आत्मविश्वास डळमळला, बघूनी वाटेमधल्या अडचणी ।। २ संशय घेता त्याचे वरती, राग येई त्याच कारणें । विश्वासाला बसतां धक्का, आवडेल कसे त्यास राहणे ।। ३ ओढून घेई मृत्युचि आपला, अकारण तो त्यास […]
दिवा होता छोटासा, एक मजकडे । इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे ।। तळांत होती योजना, तेल सांठवण्याची । शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची ।। छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन । मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी ।। देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे । प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे ।। केंद्रित […]
रंगबिरंगी सुंदर ठिपके, पंखावरी आकर्षक छटा त्या, मनास मोहीत करी…१, नृत्य पहा कसे चालते, तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती, फुलाफुला वरूनी…२, नृत्याचे आंगण त्यांचे, ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या, दरवाळताती सुवासिक…३, दोघांमधली चढाओढ, नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०