कोणते दुःख तुला छळते अकारण कां व्यथित होते ।।धृ।। प्रेमळ छत्र पित्याचे असतां गेले जीवन तुझे बागडतां लाड पुरविले आईने तव शिकवीत असतां आनंदी भाव आठव सारे याच क्षणीं ते ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते बांधून घेतां राखी हातीं आश्वासन तुजला मिळती पाठीराखा भाऊ असूनी येईल तुजसाठीं धावूनी कसली शंका मनांत येते ।।२।। […]
प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा….१, मनी आस ती राहत असते, उचलून त्यास न्यावे शिखरावरती जाता क्षणी, स्थितीरूप घ्यावे…२, प्रयत्नात साथ न मिळता, खाली कोसळते विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते…३, विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे निर्मळ पवित्र मन ते, अवलंबूनी विचारे…४ डॉ, भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
मिळता मजला बाह्य एकांत, छळते गर्दी विचारांची मन गुंतविण्या कुणी नसता, चलबिचल होते भावनांची…१, शब्द वर्णांचा घेवून आधार, भावना काढी मार्ग आपला आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला…२, शब्दांना नटवी थटवी, ध्वनी लहरी नि सूर गेयता अलंकार मिळता अंगी, रचली जाते एक कविता…३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
प्रकाश आणि अध:कार , दोन बाजू नाण्याच्या सत्व आणि तमोगुणातील शक्ती, ठरती त्या प्रभूच्या….१ सृष्टी दिसे समोर आपल्या, नयन ठेवूनी उघडे अध:कार वाटे आम्हां, त्याच मिटलेल्या डोळ्याकडे…२ जाण देई आंतून कुणी, प्रकाश तमाच्या आस्तित्वाची आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं, कल्पना ती केवळ विचारांची…३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
सुचले होते सारे कांहीं , ढळत्या आयुष्यीं । संधिप्रकाश दिसत होता, सूर्य अस्ताशीं ।१। काळोखाची भिती उराशीं, लांब आहे जाणे । कळले नाहीं यौवनांत, कशास म्हणावे जगणे ।२। समजून आले जीवन ध्येय, चाळीशीच्या पुढें । खंत वाटली जाणता, आयुष्य उरले केवढे ।३। विषय सारे अथांग होते, अवती भवती । कसा पोहू या ज्ञान सागरीं, विवंचना होती […]
संसारातील ऐहिक सुखे, धडपडीने मिळवीत असे प्रयत्नातील आनंद खरा, भोगण्यांत तो दिसत नसे उबग येई ह्याच सुखाची, जीवन खर्चीले ज्या करितां त्या सुखांत समाधान नव्हते, जाणवले तेच मिळतां प्रभू मिलनाचा आनंद तो, चिरंतर ते समाधान देयी ईश्वरी मार्ग खडतर असूनी, क्लिष्टता येते मनाचे ठायीं तसेच चाला उबग सोसूनी, कठीण अशा त्या मार्गावरती यश येईल कष्टाचे परि, […]
घोड्यावरती बसू देईना, चालू देईना पायी जगाची ही रीत , कशी समजत नाही ..१, सज्जनतेची वस्त्रे लेवूनी, निर्मळ जीवन आले आपण बरे नि काम बरे, तत्व अंगीकारले…२, मोठा झाला शिष्ठ समजोनी, वाळीत टाकीले मला दुष्कृत्यामध्ये साथ हवी, त्यातील कांहीं व्यक्तीला…३, जीवन जगणे कठीण होता, मार्ग तो बदलला आगळी धडपड करूनी, यश मिळाले मला….४, मिसळत होतो सर्वामध्ये, […]