बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी…१, तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे….२, शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला…३, बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे…४, मानवप्राणी तूं एक […]
हे शशिधरा तूं प्रेमळ सखा साऱ्या विश्वाचा सौंदर्याचे प्रतिक असूनी राजा तूं नभाचा लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी काजळ लावी तुला काही वेडे त्यास समजती तू डागाळला डाग कसला तुम्ही मानतां प्रेमामध्ये तो दोन मनांतील पवित्र नाते हे आम्हीं विसरतो समजूं शकतो नीती बंधन समाज रचनेचे बळजबरीच्या कृत्यास तुम्ही म्हणावे पापाचे गुरू […]
कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक कवि मनाशीं ‘स्व’ भावांचे करी जुळवणूक कविते […]
एके दिनीं निघून जाईन निरोप घेवून ह्या जगताचा प्रवास माझा अनंतात कसा असेल त्या वेळेचा आकाशाच्या छाये खालती विदेही स्थितींत फिरत राहीन ‘तू’ आणि ‘मी’ च्या विरहीत मी गत कर्माचे करिन मापन बाल्यातील चुका उमगल्या तरूणपणाच्या उंबरठ्यावरी सळसळणारे यौवन रक्त वृधावस्तेतील खंत ठरी पूनर्जन्म घेण्याकरितां गर्भाची निवड करीन गत जन्मींच्या चुका टाळूनी आदर्शमय जीवन जगेन […]
खरेदी केला सुंदर पक्षी, दाम देवूनी योग्य असे ते नक्षीदार पिंजरा घेवूनी, शोभिवान केले घरातें ।।१ प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं पक्षानें मान टाकली, पडला होता तळात मरूनी ।।२ क्षणभर मनी खंत वाटली, राग आला स्वकृत्याचा अकारण हौस म्हणूनी, खरेदी केला पक्षी याचा ।।३ किती बरे निच मन हे निराशा तयाला धन हानीची पक्षानेतर […]
पुजारी मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो । भाविकामधील अज्ञानाचा, उपयोग करूनी घेतो ।।१ पूजेमधल्या विधी करिता, आग्रह त्यांचा चालत असे । भक्तीरसाचे महत्त्व असूनी, त्याच्यांत त्यांना रस नसे ।।२ व्यवहारीपणाचे रूप आणूनी, बाजारी वृत्ति दाखविती । धर्माचे नाव लावूनी, भोळ्या भक्तांना लुटत असती ।।३ पुरोहित असा असावा, धर्माची करि उकलन । भक्तीमार्गाच्या वाटसरूंना, योग्य मार्ग देयी […]
चिव् चिव् करित बोलतां तुम्ही सारी भाषा दोन स्वरातून विचारांना देत असता दिशा शब्द आमचे सप्तसुरांतून येती बाहेरी व्यक्त करिती भाव सारे असती जे अंतरी दोन अक्षरी किमया सारी तुमच्या भाषेची त्याच चिव चिवे समजुन घेता धडधड ह्रद्धयाची भाव मनीचे टिपून घेण्या शब्द लागती थोडे चेहऱ्यावरल्या हलचालीनी प्रश्न उकलूनी पडे. समज तुमची आपसांतली कौतूक करणारी शब्द […]
भाकरीच्या पाठीवर ठसे दिसती हातांचे जातां तव्यावर भाजूनी निशाण राहते कष्टांचे एका भाकरीच्या पाठीं हात कितीक गुंतले कण कण देती ग्वाही मन भरुनी कसे आले उन्हां पावसात फिरे शेतामधीं शेतकरी टप् टप् घाम गाळी उभी करितो जवारी पोती पोती उचलूनी वाहून नेई मजूर दमछाक होऊनी ही मिळत नाहीं पोटभर ओवी म्हणत मुखानें आई थापिते भाकरी साऱ्यांच्या […]
कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची कां शब्द न सुचतां म्हणू तुजला, ‘ प्रेमची ‘ ।।१ वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी ।।२ जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई विश्वासाचे दोन शब्द, उभारी त्यासी देई ।।३ नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते ह्याच ईश्वरी […]