राहू केतुनो सोडून द्या तुम्ही, मगरमिठीतून चंद्राला बघा बघा ह्या प्रथ्वीवरती, काय तो हा: हा: कार मजला प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो, सौंदर्याचा मुकुटमणी झाकळला सारा नभात हा, म्हणती त्यास गिळला कुणी आत्मा जाता सोडून देहा, उरे न कांही मागे चंद्र चांदणे नभात नसता, सौंदर्याची मिटतील अंगे सौंदर्यातची बघतो सारे, जगण्यासाठी सौंदर्य हवे विश्वचक्र हे फिरत रहाण्या चंद्राचे आस्तित्व सतत हवे नष्ट होतील जीवजीवाणू, आनंद त्यांचा जाईल विरुनी बलिदानाच्या पुण्याईने परि सुटेल चंद्र मगरमिठीतून डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं झेप तुझी आणि झेप आमची, विसंगत राही असे उमलणारे फूल उद्याचे, तूं […]
छम छम बाजे पैंजण माझे मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची ।। धृ ।। स्वर्गामघुनी आले भूवरी धडधड होती तेव्हां उरी तपोभंग तो करण्यासाठीं आज्ञा होती इंद्राची ।। १।। मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची तपोबलाच्या सामर्थ्यानी प्रतिसृष्टी बनविली ज्यांनी सत्वहरण ते अशा ऋषीचे परीक्षा ठरली दिव्यत्वाची ।। २ ।। मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची […]
कितीही देशी शीतल चांदणे आनंदाचा ठरुनी मेरुमणी काट्यापरि हा मध्येंच ब डाग तुझा लक्ष्य खेचूनी ठाऊक नाहीं कधीं कुणाला कसा लागला डाग उरीं पडला असेल चुकून देखील कुणी रंग उधळतां वेड्यापरि शुभ्रपणाचा मानबिंदू हा डागरहित जीवन त्याचे केवळ एका डागापायीं सत्य झांकाळते कायमचे मिटून जातां डागही मिटतो उरते मागें सत्य तेवढे परि पुसण्यासाठी […]
ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता तुझे बालपण फुलविण्या, ओलावा देत होता घर गृहस्थीचे सुख भोवतीं, पत्नी मुला पासूनी समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल […]
नसे कुणी मी श्रेष्ठ कवी, वा ज्ञानी या जगतीं अभिमान वाटतो त्याचा मजला, जे माझ्या ललाटीं कृपादृष्टी ही दिसून आली, काव्येश्र्वरीची थोडी रचून कांही कविता सेविली, धुंदीमधली गोडी आशिर्वाद जरी असला तिचा, माझी ती बालके पितृत्वाचे नाते समजूनी, त्याना मी देखे कौतुक करतील कांही मंडळी, ज्याना ही आवडे उणीव दिसता त्यांत कुणाला, बाजूला ती पडे जाईन […]
दाही दिशांनी फिरत होतो मनी बाळगुनी तळमळ ती कसे मिळेल समाधान ते विवंचना ही एकच होती धन दौलत ही हातीं असतां धुंडाळल्या त्या बाजार पेठा न मिळे समाधीन कोठें थकली पाऊले चालून वाटा देखिले निसर्गरम्य शिखरे आणिक कांहीं प्रार्थना स्थळे शिलकीमध्यें दिसे निराशा कारण त्याचे कांहीं न कळे भावनेमधली विविध अंगे येऊं लागली […]
कारूण्यामधूनी उगम पावला आद्य काव्याचा झरा वदन करितो क्रौंच पक्षा तुज घे, मानाचा मुजरा….१, गमविले नाही व्यर्थ प्राण ते, व्याध बाणा पोटीं टिळा लावला काव्यश्वरीने, मानाने तुझ्या ललाटी…२, हृदयस्पर्शी जी घटना घडली, तडफड तव होता कंठ दाटूनी शब्द उमटले, पद्य रूप घेता….३, उगम पावता काव्य गंगा ही, वाहू लागली भूलोकी वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा, तुका, अशांचे आली […]
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची //धृ// बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची धन दूज्याचे म्हणूनी घेतले परके त्यासी नाही समजले बालपणीं जे प्रेम जमविले क्षणांत मजला तेच मिळाले भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची //१// ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची खट्याळ भाऊबहीण येथें दिर नणंद तसेच तेथे बहीण वहीनी एकच नाते हट्ट पुरविण्या […]