इमारतींचा आराखडा बनवताना ‘भूकंप’ गृहित धरतात का?
११ मार्चला जपानला महाभयंकर भूकंप झाला. सध्या रोज आपण त्याबद्दल बातम्या वाचत आहोत. निसर्ग जितका सुंदर असतो तितकाच तो रौद्रही असतो. मोठमोठ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात. मनुष्यहानी, वित्तहानी होते. हा भूकंप जसा सगळ्यांनाच त्रास देतो, तसाच तो स्थापत्य अभियंत्यालाही थकवतो. इमारतीच्या भक्कमपणाची, चांगल्या तब्येतीची जबाबदारी त्यांच्यावर असते. हल्ली आपण सगळीकडे ‘भूकंपरोधक आराखडा आहे,’ अशी जाहिरात वाचतो. […]