घरातील भिंतींना कोणते रंग लावावेत?
घरातील भिंतींना रंग लावावा, कारण त्यामुळे १) भिंतीवरील सिमेंट किंवा तत्सम पदार्थांच्या प्लॅस्टरचा टिकाऊपणा वाढतो. २) प्रत्येक खोलीत नैसर्गिक प्रकाश योग्य रीतीने व जास्त प्रमाणात पसरतो. ३) रंगीत भिंतींमुळे खोलीतील वातावरण सुंदर, आकर्षक व आल्हाददायक बनते. इंग्रजीत पेंट आणि कलर असे दोन भिन्न अर्थी शब्द आहेत, पण मराठीत मात्र पिवळ्या रंगाचा रंग लावावा असे म्हणावे लागते. […]