परमार्थ व संसार आहेत एकच
उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला ।।१।। कथा किर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले ।।२।। वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं ।।३।। जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे ।।४।। मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले […]