नवीन लेखन...

आशिर्वाद

धक्के देऊन आली   धरणीकंप करुन भावना मनीं चमकली   बनेल ही महान  ।।१।। बालपणाची मुर्ति   गोंडस तुझें भाव तेज चेहऱ्यावरती   घेती मनाचे ठाव   ।।२।। शाळेतील जीवन   दाखवी मार्ग विजयाचे सर्वामध्यें चमकून   प्रमाण मिळे यशाचे   ।।३।। एकाग्रचित्त करुनी   मिळवलेस तूं यश प्रतिष्ठा टिकवूनी   असेच जा सावकाश   ।।४।। विजे सारखी चमकूनी  झेप घे नभांत प्रकाशमान होऊनी   यशस्वी हो जीवनांत   […]

श्रद्धांजलि ।

सुळीं दिले येशूला   वेडेपणाच्या भरांत खिळे ठोकले अंगाला   रागाच्या ओघांत   ।।१।। समर्पण केले देहाचे   परि न सोडी ध्येय बलिदानाच्या मार्गाचे   हेच महत्व होय   ।।२।। सुळावरी तो जातांना   वदला आकाशी बघूनी क्षमा कर प्रभू त्यांना    ते आहेत अज्ञानी   ।।३।। कळले नाहीं ज्ञान   अज्ञान सागरांत जाणले तत्वज्ञान    उशीर केला त्यांत   ।।४।। उपयोग नाही आतां   वेळ गेली निघूनी जाण […]

आत्म गुरू

गुरूचा महीमा थोर | उघडूनी जीवनाचे द्वार || सांगूनी आयुष्याचे सार | मार्ग दाखविती तुम्हां ||१|| वाटाड्या बनूनी | भटकणे थांबवूनी || मार्गासी लावूनी | ध्येय दाखवी तुम्हां ||२|| न कळला ईश | न उमगले आयुष्य || दु:ख देती जीवन पाश | बिना गुरू मुळे ||३|| अंधारातील पाऊल वाट | ठेचाळण्याची शक्यता दाट || प्रकाशाचा किरण […]

दुःख

दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे   ।।१।। आपण कर्म केलेले आपणचि भोगतो फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो   ।।२।। आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना   ।।३।। इतरांसाठीं आहे ती भावना  उदरीं सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी   ।।४।। शोक भावना दाखवी तुझ्या […]

उपकार

उपकार करुन त्याने   मन माझे जिंकिले परि वेळ गेला निघूनी   आभार ना मानले   ।१। केली नाही परतफेड   उपकाराची मी कामाचे होते वेड   सतत मग्न कामी   ।२। कामाच्या मार्गांत   चालता पाऊल वाट प्रयत्न करुन कार्यांत   यश साधले अर्धवट    ।३। खंत वाटली मनां   आठवोनी उपकार पश्चाताप सांगु कुणा   उशीर झाला फार    ।४।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   […]

मातीचा पुतळा

मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी   ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला   ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना    ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   bknagapurkar@gmail.com          

वलय

सतत फिरत राही, चक्र जीवनाचे   । विविधता पाही ,  रंग आयुष्याचे   ।।१।। सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी   ।।२।। लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार   ।।३।। जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय   ।।४।।   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   bknagapurkar@gmail.com […]

भावनेच्या आहारीं ।

नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी   ।।धृ।।   प्राणीमात्राच्या जगती   श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी   यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी   ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी   प्राण्यास असे भावना   साथ नसे विचारांची विचार आणि भावना    साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी   ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी   बरे वाईट यांची जाण   घ्यावीस तूं ओळखूनी राहूं […]

मानवता धर्म

परमेश्वर अगाध ।  त्याच्या शक्तीचा नसे वाद ।। मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक  ।। नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती ।। प्रभु निराकार ।  निर्गुण असुनी होई साकार ।। आस्तिक प्रभु मानती ।  नास्तिक समजती शक्ति ।। ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता ।। ज्ञान प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून ।। वापरुन […]

आनंदी भाव हाच भगवंत

गेले सारे आयुष्य    परि न कळला ईश इच्छा राहिली अंतर्मनीं    प्रभू भेटावा एके दिनीं बालपणाचा काळ    करुनी अभ्यास नि खेळ मनाची एकाग्रता     केली शरीरा करिता तरुणपणाची उमेद    जिंकू वा मरु ही जिद्द करुन प्रयत्नांची पराकाष्टा    बनवी जीवन मार्ग निष्ठा संसारातील पदार्पण    इतरासाठी समर्पण वाढविता आपसातील भाव    जाणले इतर मनाचे ठाव काळ येता वृद्धत्वाचा    दाखवी मार्ग अनुभवाचा […]

1 11 12 13 14 15 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..