आठवण
अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली । योग्य वेळ येतां क्षणी, हृदये त्यांची जूळूनी गेली ।। शंका भीती आणि तगमग, असंख्य भाव उमटती मनी । विजयी झाले ऋणाणू बंध, बांधले होते हृदयानी ।। उचंबळूनी दाटूनी आला, हृदयामधला ओलावा । स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा ।। मनी वसविल्या घर करूनी, क्षणीक सुखांच्या आठवणी […]