नवीन लेखन...

संशयी मन

भरवशाची घेऊन शिदोरी,  पाऊलवाट  चालत होता  । कुणीतरी आहे मार्गदर्शक,  यापरी अजाण होता  ।। बरसत होती दया त्याची,  जात असता एक मार्गानी  । आत्मविश्वास डळमळला,  बघूनी वाटेमधल्या अडचणी  ।। संशय घेता त्याचे वरती,  राग येई त्याच कारणें  । विश्वासाला बसतां धक्का,  आवडेल कसे त्यास राहणे  ।। ओढून घेई मृत्युचि आपला,  अकारण तो त्यास दुराऊनी  । जागृत […]

आधुनिकता

नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते  । आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते  ।। ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते  । प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते  ।। मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी  । परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं  ।। मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार  । ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला जाई वेळेनुसार  ।। […]

प्राण ज्योत

दिवा होता छोटासा, एक मजकडे  । इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे  ।। तळांत होती योजना, तेल सांठवण्याची  । शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची  ।। छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन  । मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी  ।। देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे  । प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे  ।। केंद्रित […]

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे….४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क […]

फूलपाखरे नि फुले

रंगबिरंगी सुंदर ठिपके,  पंखावरी आकर्षक छटा त्या,  मनास मोहीत करी…१, नृत्य पहा कसे चालते,  तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती,  फुलाफुला वरूनी…२, नृत्याचे आंगण त्यांचे,  ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या,  दरवाळताती सुवासिक…३, दोघांमधली चढाओढ,  नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?….४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सासरीं जाण्याऱ्या मुलीस उपदेश-

कोणते दुःख तुला छळते अकारण  कां व्यथित होते  ।।धृ।। प्रेमळ छत्र पित्याचे असतां गेले जीवन तुझे बागडतां लाड पुरविले आईने तव शिकवीत असतां आनंदी भाव आठव सारे याच क्षणीं ते  ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते बांधून घेतां राखी हातीं आश्वासन तुजला मिळती पाठीराखा भाऊ असूनी येईल तुजसाठीं धावूनी कसली शंका मनांत येते  ।।२।। अकारण तूं […]

संस्कारमय मन

प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा….१, मनी आस ती राहत असते,  उचलून त्यास न्यावे शिखरावरती जाता क्षणी,  स्थितीरूप घ्यावे…२, प्रयत्नात साथ न मिळता,  खाली कोसळते विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते…३, विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे निर्मळ पवित्र मन ते,  अवलंबूनी विचारे…४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

रचली जाते कविता

मिळता मजला बाह्य एकांत, छळते गर्दी विचारांची मन गुंतविण्या कुणी नसता, चलबिचल होते भावनांची…१, शब्द वर्णांचा घेवून आधार, भावना काढी मार्ग आपला आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला…२, शब्दांना नटवी थटवी, ध्वनी लहरी नि सूर गेयता अलंकार मिळता अंगी, रचली जाते एक कविता…३   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com        

उमलणारी फुले

चोर पावली येता तुम्हीं,  साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या,  नाजुक नाजुक पऱ्या निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे,  संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे,  उमलताती सकाळीं चाहुल न ये कुणासी,  तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते,  पोंच सौंदर्याची आकर्शक ते रंग निराळे,  खेची फुलपाखरें मध शोषण्या जमती तेथे,  अनेक भोवरे सुगंध दरवळून वातावरणीं,  प्रसन्न चित्त करी जागे करीती जगास,  चैतन्यमय […]

बंधनातील चिमणी

चिव चिव करीत,  एक चिमणी आली  । दर्पणाच्या चौकटीवरती,  येवून ती बसली  ।। बघूनी दूजी चिमणी दर्पणी,  चकीत झाली होती  । वाटूं लागले या चिमणीला,  आंत अडकली ती  ।। उत्सुकता नि तगमग दिसे,  चेहऱ्यावरी  । चारी दिशेने बघत होती,  आंतल्या चिमणी परी  ।। औत्सुक्याचे भाव सारे दिसती,  आतील चिमणीतही  । कशी करूं तिची बंधन मुक्ती,  काळजी […]

1 16 17 18 19 20 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..