MENU
नवीन लेखन...

द्रौपदी वस्त्रहरण

ह्रदयद्रावक प्रसंग आला द्रौपदीवरी, विटंबना करुं लागले कौरव जमुनी सारी ।।१।। द्युतामध्यें हरले होते पांडव बंधू सारे, द्रौपदीस लावले पणाला जेव्हां कांहीं न उरे ।।२।। वस्त्रहरण करीत होता दुष्ट तो दुर्योधन, हताश झाले होते पांडव हे सारे बघून ।।३।। ‘ द्वारकेच्या कृष्णा ‘ धावूनी ये मी दुःखत पडे, मदतीचा केला धांवा कृष्ण बंधूकडे ।।४।। धावूनी आला […]

श्री कृष्णाची भक्ताला मदत

घटना घडली एके दिवशी प्रभू बसले जेवण्या, रुख्मिणी त्यांचे जवळी होती वाढण्या ।।१।। चट्कन उठूनी ताटावरुनी धावत गेले दारीं, क्षणिक थांबूनी तेथे येऊनी बसले पाटावरी ।।२।। प्रश्न पडला रुखमिणीस काय गडबड झाली, श्रीकृष्णाची धावपळ तिजला नाही कळली ।।३।। चौकशी करतां कृष्ण बदले कहाणी एका भक्ताची, हरिनाम मुखी नाचत होता काळजी नव्हती लोकांची ।।४।। वेडा समजोनी त्यासी […]

ईश्वराची बँक

प्रभूंने बँक काढली उघडा खाते, ठेवा पूंजी आपली आणा सुख जीवनाते ।।१।। जेवढे गुंतवाल मिळेल व्याजा सहित, दरा विषयीं तो आहे अगणित ।।२।। ही बँकच न्यारी तुम्हां न दिसेल कोठे, धुंडाळूं नका संसारी होईल दुःख मोठे ।।३।। पाप पुण्याची ठेव जमा करिते बँक, जसा असेल भाव तशी देईल सुख दुःख ।।४।। गरज पडतां धन मिळणे हे […]

चेतना

ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले, गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।। आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली, भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली । चित्र बघूनी जे मन नाचे, पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ […]

परमार्थ व संसार आहेत एकच

उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला, भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला । कथा कीर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले, माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले । वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं, फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं । जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे, प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे । मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले […]

पूजाविधी गाभा

सोडूनी दिली पूजाअर्चा, समाधान मज ज्यात न लाभले, दैनंदिनीच्या कार्यक्रमातील, एक भाग तो सदैव वाटले ।।१।। बालपणी कुणी शिकविले, पूजाअर्चा आन्हकी सारे, ठसले नाही मनात कधीही, भक्तीला हे पोषक ठरे ।।२।। पूजाअर्चा विधीमध्ये, लक्ष केंद्रीत होते, हळदी कुंकू गंध फुलें आणि, दीपधूप हे मधूर जळते ।।३।। सुबकतेच्या पाठी लागूनी, यांत्रिकतेसम आम्ही झालो, अर्थ ज्याचा कधी न […]

निसर्गाची आनंदासाठी मदत

कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी तुझ्या मोरानें दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी निसर्गातील विवीधता देई […]

हट्टी अनु

एक होती अनु, फुलासारखी जणू, डोळे फिरवी गर्र गर्र, पाऊल टाकी भरभर, तिला लागली भूक, गडू दिला एक, बघितला रिकामा गडू, तिला आले रडूं, आईने दूध भरले, कांठोकांठ ओतले, तिला हवे होते जास्त, दूध होते मस्त, रडरड रडली, आदळ आपट केली, सांडूनी गेला गडू, पाठींत बसला मात्र धम्मक लाडू ।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० […]

मयुरा तूं आहेस गुरु

मयुरा तूं आहेस गुरु, तुला आम्हीं वंदन करु ।।धृ।। नदी कांठच्या वनीं, थुई थुई नाचूनी, पिसारा फुलवुनी, तुझे पाहूनी नृत्य, ताल धरु मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।१।। मोरपिसे सुंदर, रंग बहारदार, दिसे चमकदार, बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं, मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।२।। रुप डौलदार, चाल […]

झांझीबार डायरी

इ-पुस्तक स्वरुपात फक्त रु.९९/- परदेशातल्या विमानतळावर उतरल्याबरोबर आपण अगदी नकळत तुलना करु लागतो …. आपली आणि त्यांची…. खरंच देश-विदेशातील माणसं हजारो मैलांवर रहात असतांना त्यांचे धर्म वेगळे असतील पण सवयी आणि लकबी सारख्या कशा? का खरंच भगवंताने एकाच पिंपातला बचक बचक “डीएनए” जगातल्या आपल्या सर्व बछड्यांना अगदी सारखा वाटला? जागतिक बॅंकेचे परिवहन विषयातील सल्लागार असलेले अरुण […]

1 20 21 22 23 24 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..