चित्त मंदीरी हवे
लोटांगण घालूनी शरण गेला, देव मंदीरीं तो । आदर दाखविण्या ईश्वरठायीं, प्रयत्न करीतो ।। समर्पणाचे भाव दाखविण्या, देहाला वाकवी । मन जोपर्यंत विनम्र नसे, प्रयत्न व्यर्थ जाई ।। मंदीरी तुमचे शरीर असूनी, मन असे इतरीं । श्रम तुमचे निरर्थक बनता, मिळेल कसा श्रीहरी ।। इतरत्र राहूनी चित्त तुमचे, असतां मंदीराकडे । खरे पुण्य पदरीं पडते, हेंच […]