नवीन लेखन...

आरसा

दाखवितोस हूबेहूब रुप    आरशामध्ये मला मीच माझे रुप बघूनी    चमत्कार वाटला सत्य स्थितीचे द्दष्य करुनी    दाखविलेस सर्वाला उणें अधिक न करितां   तसाच दिसे आम्हाला गुणदोष बघूनी देहाचे    मुल्य मापन करितो आम्हीं चांगले राहण्या शिकवी    हीच युक्ती नामी कांचेच्या आरशापरीं असे    मनाचा अरसा आत्म्याची मलीनता दाखवुनी   चांगला बनवी माणसा   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

मुंगी

मग्न राही सतत   आपल्याच कामीं अन्नासाठी तूं    फिरे दाही दिशानी जमवितेस कणकण    एकत्र करुनी दूर द्दष्टीचा स्वभाव    दिला तुज कुणी सुंदर तुझी वास्तूकला   वारुळ केले छान सहस्त्रांच्या संखे     राहतेस आनंदानं कष्ट करण्याचा गुण    दाखवी साऱ्याना कष्टाला पर्याय      नसे ह्या जीवना डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

स्फूर्ती दाता

तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी […]

उदबत्ती एक आत्मसमर्पण

उदबत्तीचा सुगंध    दरवळे चोहोकडे कोठे लपलीस तूं      प्रश्न मजला पडे मंद मंद जळते     शांत तुझे जीवन धुंद मना करिते    दूर कोपरीं राहून जळून जातेस तूं    राख होऊनी सारी तुझे आत्मसमरपण    सर्वत्र सुगंध पसरी तुझेपण वाटते क्षुल्लक    दाम अति कमी आनंदी होती अनेक     जेव्हां येई तूं कामीं लाडकी तूं भक्तांना    तुजवीण पूजा नाहीं प्रफूल्ल करुन चेतना    प्रभू […]

बाबांच्या रुपांत, तुम्ही आहांत काका

शंभर वर्षे जगा तूम्हीं,  काका आमच्यासाठीं बाबांच्या रुपांत रहा,  तुम्ही सर्वांच्या पाठीं भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे उशीर झाला होता,  जेंव्हा जीवन उमगले कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले आंबा गेला मोहरुनी,  लाविली होती त्यांनी झाडे दुर्दैवाने आमच्या, बघण्यास नाही ते फळाकडे मध्येच सोडूनी गेले, नाटक […]

भिकारीण

मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर    ।। हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला    ।। परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत    ।। जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी   ।। […]

संकटातील चिमणी

शांत होती रात्र सारी,  आणि निद्रे मध्ये सारे खिडकी मधूनी वाहे,  मंद मंद ते वारे….१ तोच अचानक तेथे,  चिमणी एक ती आली मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली….२ जाग येता निद्रेतूनी,  बत्ती दिवा पेटविला काय घडले भोवती,  कानोसा तो घेतला….३ माळावरती बसूनी,   चिव् चिव् चालू होती बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती….४ मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे […]

श्री कृष्णाची भक्ताला मदत

घटना घडली एके दिवशी    प्रभू बसले जेवण्या रुख्मिणी त्यांचे जवळी    होती वाढण्या  ।।१।। चट्कन उठूनी ताटावरुनी    धावत गेले दारीं क्षणिक थांबूनी तेथे    येऊनी बसले पाटावरी  ।।२।। प्रश्न पडला रुखमिणीस   काय गडबड झाली श्रीकृष्णाची धावपळ    तिजला नाही कळली  ।।३।। चौकशी करतां कृष्ण बदले    कहानी एका भक्ताची हरिनाम मुखी नाचत होता    काळजी नव्हती लोकांची  ।।४।। वेडा समजोनी त्यासी […]

ईश्वराची बँक

प्रभूंनी बँक काढली    उघडा खाते ठेवा पूंजी आपली    आणा सुख जीवनाते  ।।१।। जेवढे गुंतवाल    मिळेल व्याजा सहित दरा विषयीं     तो आहे अगणित  ।।२।। ही बँकच न्यारी    तुम्हां न दिसेल कोठे धुंडाळूं नका संसारी    होईल दुःख मोठे  ।।३।। पाप पुण्याची ठेव    जमा करिते बँक जसा असेल भाव     तशी देईल सुख दुःख  ।।४।। गरज पडतां धन मिळणे   हे […]

चेतना

ओठावरले गीत माझे,  आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता,  ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।। आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली चित्र बघूनी नाचे मन जे पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ कसे […]

1 7 8 9 10 11 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..