नवीन लेखन...

बुलेटप्रूफ काच

समजा तुम्ही युद्धसदृश किंवा जिथे दंगल चालू आहे अशा ठिकाणी गेलात तर तुम्हाला केव्हाही गोळी लागण्याचा धोका असतो. गोळी थेट तुमच्या शरीराचा वेध घेऊ शकते. मग यावर उपाय काय पळून जाणे पण पळता पळता गोळी लागतेच. बंदुकीच्या गोळीपासून बचाव करण्यासाठी असे एखादे आवरण तुमच्या शरीरासमोर असले पाहिजे, की ज्यावर ती गोळी लागेल व तिची गतीज ऊर्जा विखुरली जाईल. […]

ध्वनिमापक यंत्र

कर्णकर्कश आवाज हा शरीर व मनाला दोन्हींनाही पीडा देणारा असतो; त्यामुळे ध्वनिप्रदूषण हे हानिकारक असते. न्यायालयांच्या हस्तक्षेपामुळे आता काही प्रमाणात या ध्वनिप्रदूषणापासून लोकांना दिलासा मिळाला आहे. […]

ध्वनिरोधक खिडक्या

फार थोड्या लोकांना घरात शांततेचा अनुभव मिळतो. रात्रीच्या वेळी कुत्री भुंकत असतील किंवा शेजाऱ्यांचा म्युझिक प्लेयर, टीव्ही जोरदार आवाजात भोवतालच्या जगाचा विसर पडून वाजत असेल तर झोपेची वाट लागायला वेळ लागत नाही. […]

किरणोत्सर्ग शोधक (रेडिएशन डिटेक्टर)

जपानमध्ये सध्या फुकुशिमा येथील दाईची अणुप्रकल्पात सुनामी लाटा व भूकंप या दोन्हीमुळे झालेल्या अणुदुर्घटनेमुळे किरणोत्सर्ग झाला आहे. ही किरणोत्सारी घटकद्रव्ये आता तेथील अन्नपदार्थातही मिसळली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

बुलेटप्रूफ जॅकेट

बुलेटप्रूफ जॅकेटची चर्चा मुंबई हल्ल्यानंतर प्रामुख्याने झाली होती. ती जॅकेट्स ही चांगल्या दर्जाची नव्हती, असेही त्यावेळी सांगण्यात आले. शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला चिलखत परिधान करून गेले होते, यावरून अशा साधनाची आवश्यकता फार जुन्या काळापासून जाणवत होती हे उघड आहे. […]

हेडफोन

हेडफोनने श्रवणाच्या क्षेत्रात मोठीच क्रांती केली आहे यात शंका नाही. आजकाल आपण मोबाइल फोन, एमपी ३ प्लेयर यातही हेडफोनचा वापर करतो त्यामुळे फोन कानाला लावायची गरज राहात नाही. […]

प्लाझ्मा टीव्ही

एलसीडी टीव्हीमध्ये जसा लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे प्लाझ्मा टीव्हीत प्लाइमा सेल्सचा वापर केला जातो. हे प्लाझ्मा सेल्स म्हणजे फ्लुरोसंट लॅपवर आधारित चेंबर्स असतात. आपले सीएफएल बल्ब ज्या तंत्रज्ञानावर चालतात त्याच पद्धतीने हे प्लाझ्मा सेल कार्यान्वित केले जातात. […]

एलइडी टीव्ही

एलइडी टीव्ही हा असा एलसीडी टीव्ही असतो की, ज्यात बॅकलायटिंगसाठी एलइडीचा वापर केलेला असतो. पारंपरिक एलसीडी टीव्हीमध्ये बॅकलायटिंगसाठी कोल्ड कॅथोड फ्लुरोसंट लाईट्सचा वापर केलेला असतो, त्यामुळे तो प्रत्यक्षात एलइडी डिस्प्ले नसतो तरीही त्याला एलइडी टीव्ही असे म्हणतात. […]

हाय डेफिनेशन टीव्ही (एचडीटीव्ही)

हाय डेफिनेशन टेलिव्हिजन याचा अर्थ अतिशय सुस्पष्ट चित्र दाखवणारा टीव्ही असा आहे. पारंपरिक टीव्हीवरील चित्रापेक्षा यावरील प्रतिमा अधिक स्पष्ट असतात कारण त्यात प्रत्येक चित्रचौकटीत १० ते २० लाख रंगबिंदू म्हणजे पिक्सेल असतात. […]

एलसीडी टीव्ही

एलसीडी याचा अर्थ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. या तंत्रज्ञानाचा वापर करून जे टीव्ही संच तयार केले जातात त्याला एलसीडी टीव्ही म्हणतात. पारंपरिक कॅथोड रे ट्यूब वापरलेल्या टीव्हीपेक्षा एलसीडी टीव्ही हे सडपातळ असतात, तसेच हलकेही असतात. […]

1 2 3 4 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..