६ – गणरायाचा विलसे नृत्यविहार
मृदंग घुमतो , घुंगुरनादीं वीणेचा झंकार नगराजावर गणरायाचा विलसे नृत्यविहार ।। खलनिर्मूलन विघ्ननिवारण पळभर ठेवुन मागे श्रीगणनायक बह्मांडाचा-पालक नाचूं लागे पदन्यासातुन युगभाग्या करि जागृत जगताधार ।। नाचतसे वक्रतुंड , नाचे अंग अंग त्याचें नाचतात पद, भुजा नाचती , विशाल तन नाचे नयनांमधुनी उल्हासाचा नर्तन-आविष्कार ।। सुपासारखे कान नाचती, पुष्ट नाचते सोंड ओठ नाचती, […]