नवीन लेखन...

सुखाचे संदर्भ

रविवार या एकाच दिवशी मनासारखे झोपायला मिळते म्हणून जाग आलेली असतानाही मी आणि माझा दहा वर्षाचा मुलगा अंथरुणावर लोळत पडलो होतो. बायको उठली आहे हे किचनमधल्या भांडयाच्या आवाजावरून कळत होते. कुठलेही भांडे गॅसवर ठेवण्याआधी ते टिकाऊ आहे की नाही हे आपटून बघते की काय कळत नव्हते. “अरे दहा वाजले, उठा आता दोघेही.” “काय यार मम्मी पण, […]

गोंधळ

आडगेवाडीतल्या अण्ण्याचं लग्न व्यवस्थित पार पडलं. जास्त काही नाही, फक्त दोन डोकी फुटली. एका आगाउु आडगेवाडीकराने वर्‍हाडातल्या पोरीला शिटी मारली म्हणून थोडा दंगा झाला, पण बापूच्या चोख व्यवस्थापणामुळे लगेच आटोक्यात आला. लग्न होउुन चार दिवस उलटले. पूजा झाली, फक्त गोंधळ तेवढा बाकी होता. आईबापाला काही पडलेली नव्हती, ते गोंधळात इंटरेस्टच घेत नव्हते. म्हणून अण्ण्याने बापूला सांगून […]

पासपोर्ट : एक सुखद अनुभव

माझा पासपोर्ट अप्लाय केल्यापासून तिसर्‍या दिवशी तो घरात आला आणि माझ्या डोक्यातल्या सरकारी यंत्रणेला छेद बसला. थोडक्यात म्हणजे गोगलगायच्या गतीने काम करणार्‍या गवरमेंटवरचा विश्वास उडाला. लोकांच्या कामाच्या बाबतीत अतिदक्ष असणारे आपले सरकार एवढे कार्यक्षम झाले असेल ही स्वप्नातदेखील कल्पना नव्हती. मी साध्या पासपोर्टबद्दल बोलतोय. तात्काल नव्हे. जिथे तात्काल पासपोर्ट यायला आठ दिवस लागतात तिथे साधारण पासपोर्ट […]

बायको नावाचे अजब रसायन

“घरची थोडी तरी कामे करत जा. हॉटेलवर आल्यासारखे घरी येता आणि सकाळी उठल्या उठल्या आॅफिसला जाता!” मला खात्री आहे, बर्‍याच नवरेमंडळीना हे वाक्य थोडयाफार दिवसांनी ऐकायला लागतेच. […]

पिशव्या बघायची खोड

लंडनच्या बीबीसीत नसतील एवढया सनसनाटी बातम्या आडगेवाडीच्या देवानंद हेअर कटींग सलूनमध्ये चर्चेत असायच्या. गावातली कुठलीही खबर या ठिकाणी लागली नाही असे कधीच व्हायचे नाही. बारा तास इथे लोकांचा राबता असायचा. इलेक्शनची सभा, चावडीची मिटींग, बुडीत सोसायटीची चर्चा चार लोकांच्यात इथेच व्हायची. सलूनमध्ये येउुन बसायला कुणालाही मज्जाव नव्हता. उलट कोण आला की नारु हातातल्या धारदार शस्त्रासह नमस्कार घालून त्याचे स्वागतच करायचा.  […]

…आणि चष्मा लागला

स्थळ ठाणे रेल्वे स्टेशनचा तीन नंबरचा फलाट. तीन नंबरवर येणारी गाडी मी दोन नंबर फलाटावरच येते आहे असे समजून गाडी येणार्‍या फलाटाच्या कडेला जाउुन वाकून बघत होतो. एवढयात दिन्याने नुकत्याच खाल्लेल्या सुप्रसिद्ध कचेरी मिसळीचे उपकार विसरून मी आंधळा असल्याचे फलाटाच्या त्या गर्दीतच जाहीर केले. […]

बायको आणि तिचा मोबाईल

परवा पेपरात बायकोने नवर्‍याला मारायची सुपारी दिल्याची बातमी वाचल्यावर माझे होश उडाले. कारण होते नवरा सतत वॉट्सअॅप आणि फेसबुकवर असायचा. मलाही वॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर जरा कमी करायला हवे याची प्रकर्षाने जाणीव झाली. […]

गावगुंड

आमच्या गावी एक सार्वजनिक कुत्रा होता. आम्ही सगळेजण त्याला गावगुंड म्हणत असू. तपकिरी रंग आणि काळसर तोंड असलेला हा गावगुंड गावातल्या सगळया मोकाट कुत्र्यांचा बादशहा होता. वैयक्तिक पाळलेली कुत्रीही याच्यासमोर अंगापिंडाने किडमिडीत वाटायची. शहाणी कुत्री तर याच्या सावलीलाही यायची नाहीत. […]

मला भेटलेला स्पायडरमॅन

स्पायडरमॅन पिक्चर पाहिल्यानंतर आपल्या अंगी अचाट करामती करता येण्यासारखी स्पायडरमॅन, ही मॅन, शक्तीमॅन किंवा हनुमॅन यांच्याप्रमाणे कुठलीही शक्ती नाही या विचाराने थोडा न्युनगंड आला होता. पण जवळ काहीही आॅप्शन नसल्याने तो ही थोडया दिवसांनी गेला आणि मी पुन्हा नॉर्मल झालो. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..