MENU
नवीन लेखन...

२०१७ मधील विजयदुर्ग महोत्सव

पर्यटकांप्रमाणे इतिहासप्रेमींना, अभ्यासकांना, संशोधकांना, जिज्ञासूना, कोकण प्रेमीचना आणि सौंदर्याच्या उपासकांना विनालंब आणि बिनाअडथळा आनंद लुटत असतात. विजयदुर्ग-देवगड ही विजयी देशभूमी आहे. परशुरामाने वसविलेली ही पावन भूमी आहे.विजयदुर्ग-देवगड नावातच सर्व काही आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला येथील सौंदर्य स्थळांचा, निसर्ग स्थळांचा ऐतिहासिक स्थळांचा, परिचय करून देऊन पर्यटक इकडे मोठया संख्येने आकृष्ट करण्यासाठी २०१७ मधील विजयदुर्ग […]

गोष्ट एका रात्रीची – भीमाशंकर ते खांडस

गोष्ट ३-४ वर्षापूर्वीची आहे. एका मोठ्या ग्रुप बरोबर मी या ट्रेकला गेलो होतो. एखाद्या मोठ्या ग्रुप बरोबर ट्रेकिंगला जाताना नेहमीच मी रस्ता पाहून घेण्यासाठी जात असतो. ग्रुपच्या म्हणून अनेक मर्यादा असतात. आपल्याला हवा तसा मनसोक्त वेळ मिळत नाही. हवं तेव्हा, हवं तिथे हवं ते खाता येत नाही. फोटो काढण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळत नाही. एकच फायदा […]

लोणावळ्याजवळचा कोरीगड

गड, कोट, किल्ले असे शब्द घेतले की, डोळय़ांसमोर इतिहास नाचू लागतो. राजवटी, लढाया, पराक्रम, कटकारस्थाने आणि अशा कितीतरी स्थलकालाच्या घटना त्या त्या वास्तूभोवती फेर धरायला लागतात. पण प्रत्येक गडकोटांना असा ज्वलंत इतिहास मिळतोच असे नाही. पण अशांपैकी काहींचे भाग्य मात्र मग भूगोलात उजळते आणि निसर्ग त्यांना आपली सारी अपूर्वाई बहाल करतो. या कुळातीलच एक लोणावळय़ाजवळचा कोरीगड! […]

गोष्ट धारावीच्या ‘काळ्या किल्ल्या’ची – (भाग दोन)

या कथेच्या पहिल्या भागात बघितलेला ‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे. आता भाईंदरच्या या किल्ल्याचे नाव देवीवरून पडले की देवीवरून किल्ल्याचे नाव पाडले हे समजणे कठीण आहे. ‘काळा किल्ल्या’चे कागदोपत्री नाव ‘रीवाचा किल्ला’ […]

गोष्ट धारावीच्या ‘काळ्या किल्ल्या’ची – (भाग एक )

धारावी. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासीक किल्ला आपलं अस्तित्व टिकवायला धडपडतोय. या किल्ल्याची बहुसंख्य ‘मुंबई आमची, नाही कोनाच्या बापाची’ म्हणणाऱ्यांना खबरही नसेल हे निश्चित..! इसवी सन १७३७ मध्ये उभारलेल्या या किल्ल्याचं नांव ‘फोर्ट रिवा किंवा रेवा’ असं असलं तरी पूर्वीपासून हा किल्ला ‘काळा किल्ला’ […]

अरण्यातला काळदुर्ग

“काळदुर्गला” भेट द्यायची असल्यास “पावसाळा” हा उत्तम ऋतू त्यात ही श्रावण महिन्यात येथे आल्यास ऊन-पावसाचा मस्त खेळ अनुभवता येतो, इथलं वातावरण सुद्धा कधी सूर्यप्रकाशित तर उंच गडावर ढगांची चादर पसरल्यामुळे पावसाच्या सरी कायम बरसतात.
[…]

धारावीचा काळा किल्ला

धारावी मधे किल्ला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण धारावीची प्रसिद्धी इतर कारणांनी अगदी जगप्रसिद्ध झालेली आहे. धारावीच्या या लहानशा किल्ल्याला काळा किल्ला म्हणतात. स्थानिक लोकांमधे तो काळा किल्ला अथवा ब्लॅक फोर्ट म्हणूनच प्रसिद्ध आहे. […]

किल्ले अंकाई टंकाई

अंकाई-टंकाई चा उल्लेख काही ठिकाणी अणकाई – टणकाई असाही केला जातो. हे जोडकिल्ले अजिंठा-सातमाळ रांगेत वसलेले आहेत. अंकाई जवळ ही रांग काहीशी तुटलेली आहे. या तुटलेल्या भागामधूनच गाडीरस्ता आणि रेल्वे मार्ग जातो. […]

चिपळूणचा गेवळकोट

चिपळूणपासून साधारण ४ कि.मी. अंतरावर गोवळकोटचा डोंगरी किल्ला आहे. या ५० मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला किल्ला तिनही बाजुनी वस्तीने घेरलेला आहे.
[…]

किल्ले विशाळगड

शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणार्‍या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..