नवीन लेखन...

वासनेतील तफावत

विपरित वागूनी मन, नाश करीते शरीराचा । वासनेतील तफावत, काळ बनतो इंद्रियाचा…१, उदर भरले असताना, अन्नाला विरोधते पोट । परि अतृप्तता जिभेची, घालते आग्रहाचा घाट….२, मद्य सेवन करीता, झिंग ती येवून जाते । मेंदूतील चेतनेसाठीं, यकृत बिघडूनी जाते…३, नाच गाणे देत असते, सूख नयनां – कर्णाला । शरीर वंचित होते, मिळणाऱ्या त्या विश्रांतीला….४ एक इंद्रियाची वासना, […]

रावण वृत्ती

रावण नव्हता कुणी राजा, ती होती व्यक्ति । व्यक्तीचा तो इतिहास नव्हता, ती होती प्रवृत्ति….१, आजही दिसती कित्येक आम्हा, रावण या जीवनीं । कशी रंगेल जीवन कथा, रावणा वांचूनी…२, विरोधात्मक बुद्धी तुमची, अडथळे आणते । क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते…३, सद्‌गुणांचा पाया खोलवर, जेवढा तो गेलेला । रावण वृत्ति हार जाईल, त्याच मग वेळेला….४   […]

यश येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।। निराशूनी जावू नकोस रागें रागें । हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।। विणाविस यशाची शाल धागे धागे । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।। सतत रहावे जीवनी जागे जागे । तेव्हाच यश येत असते भागे भागे ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली । दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली…१, जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते । क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते…२, निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल । पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ…३, स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत मन […]

सुक्ष्मात अनंत

एकटाच बसलो होतो, खोलीमध्यें शांत करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१,   दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे…२,   जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करीता, जाण त्याची येती….३,   वातावरण निसर्गाने, व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंततेचे, गुण एकाचे अंगी….४,   तेथे आहे जे येथेही, व्यापूनी सर्व स्थळी […]

1 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..