नवीन लेखन...

निरोगी देही नामस्मरण

निरोगी असतां तुम्ही, नामस्मरण करा प्रभूचे, ठेवू नका उद्या करीता, महत्व जाणा वेळेचे ।।१।। शरिराच्या नसता व्याधी, राहू शकता आनंदी, आनंदातच होऊ शकते, चित्त एकाग्र ते ।।२।। व्याधीने जरजर होता , चित्त होई अस्थीर, स्थिरतेतत दडला ईश्वर, जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सारेच खेळाडू

खेळाच्या त्या मैदानीं, रंगात आला खेळ, मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ ।।१।। खेळाच्या कांहीं क्षणी, टाळ्या शिट्या वाजती, आनंदाच्या जल्लोषांत, काही जण नाचती ।।२।। निराशा डोकावते, क्वचित त्या प्रसंगीं, हार- जीत असते, खेळा मधल्या अंगी ।।३।। सूज्ञ सारे प्रेक्षक, टिपती प्रत्येक क्षण, खेळाडू असूनी ते, होते खेळाचे ज्ञान ।।४।। मैदानी उतरती, ज्यांना असे सराव, जीत त्यांचीच […]

वेळेचे मूल्य

मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे, गमावून टाकी, जाणूनी फुकाचे ।।१।। लागत नसते, दाम वेळेसाठीं, म्हणून दवडे, अकारणा पोटीं ।।२।। वस्तूचे मूल्य ते, पैशांनीच ठरते, परी वेळेची किंमत, कुणा न समजते ।।३।। वेडे आहोत सारे, कसे होई मूल्य वेळ जातां मग, आयुष्य जाईल ।।४।। आयुष्य खर्चणे, हेच वेळेचे मुल्य ठरते, जीवनांतील यश, त्यावरुन कळते ।।५।। डॉ. […]

नशीब

का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें, यत्न होता भगिरथी, नशीब येईल संगे ।।१।। प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें, यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते ।।२।। प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल, इच्छा शक्ती प्रभावानें, नशीबही बदलेल ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो, घाण वाटली मजला, अमंगल संबोधूनी, लाखोली देई तिजला  ।।१।। संतापूनी मजवर , कान उघडणी केली, तुझ्याचमुळें मूर्खा मी, अमंगळ ती ठरली।।२।। आकर्षक रूप माझे, लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी, केले सारे तूंच फस्त ।।३।। परि मिळतां तुझा तो, अमंगळ सहवास, रूप माझे पालटूनी, मिळे हा नरकवास ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

काळ घेई बळी

जात असता गाडी मधूनी, दुर्घटना ती घडली, अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली ।।१।। प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले, वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले ।।२।। घिरट्या घालीत काळ आला, झडप घातली त्याने, वेळ आली नव्हती म्हणूनी, बचावलो नशिबाने ।।३।। अपमान झाला होता त्याचा, सुडाने तो पेटला, थोड्याशाच अंतरी जावूनी, दुजाच बळी घेतला ।।४।। डॉ. भगवान […]

आत्मा हाच ईश्वर

आत्म्याला ओढ असते     ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते     प्रभुमय स्वरुपाची   ।।१।। अंशात्मक भाग असे    आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते  आकर्षण     गुणस्वभाव तो त्याचा   ।।२।। आत्म्यास पडले असे    बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी    प्रयत्न करी मुक्तीचे   ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं    अनंतात समावतो परमेश्वरि रुपांत    विलीन होऊन जातो   ।।४।। आत्मा मुक्त होत असे     देहकर्म फळावर […]

सार्थकी जीवन

सारे जीवन जाते, आपले अन्न शोधण्याकडे, काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।। जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे, आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।। धडपड करी आम्ही, सारी देह सुखासाठी, विचार ही मनांत नसतो, इतरांच्या करिता ।।३।। वेळ काढावा जीवनातुनी, इतरांसाठी थोडा, सार्थकी लावा आयुष्य तुम्ही, जीवन शिकवी धडा ।।४।। डॉ. भगवान […]

तमोगुण

राज्य तमाचे येथें बाह्य जगावरती, म्हणून दिसे आम्हां, विध्वंसक प्रवृती ।।१।। नाश करण्यासाठीं शक्तीच हवी येथे, हेच रुप शिवाचे, समजण्या अवघड जाते ।।२।। जागा करु देई, नविन घटनांना, चक्र कसे चालेल, न मिटवता त्यांना ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

त्यांचे नाते

कोण लागतात माझे, नाते ते ठाऊक नाहीं, देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं ।।१।। विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें, पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते ।।२।। देवाण घेवाण आत्म्याची, आपसामध्यें चालती, शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती ।।३।। फुले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात, दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।। अदृश्य असले नाते, असावे […]

1 2 3 4 5 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..