नवीन लेखन...

ज्ञान साठा

जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची ।।१।। प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।। एक किरण तो पूरे जाहला, अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां, फुलून येते ज्ञान वाहण्या…..||३|| डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

बेताल स्वछंदीपणा

काढूनी झाडाच्या सालींचा    आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला      बंधन पडले त्या  क्षणीं   ।।१।। नग्नपणें फिरत होता    श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां    स्वच्छंदाला बाधा पडे    ।।२।। स्वतंत्र असूनी देखील    पडते  परिघ भोवती जीवन जगण्या करितां    बंधने ती कांहीं लागती    ।।३।। स्वांतत्र्याची  तुमची व्याप्ती     असावी  दुजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने    संस्कृतीस होइल हानी   ।।४।। ओंगळपणाचे […]

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।। देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।। कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

अंतर्मनातील आवाज

ध्यान लागतां डुबूनी जाई अंतर्यामीं बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी ।।१।। चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे ।।२।। संवाद होता आत्म्याशी विचारा सारे आतून कांहीं ।।३।। आंतल्या आवाजांत  सत्याचा भाव भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव ।।४।। नियमीत ध्यान साधना करती इतर जीवांचे प्रश्न समजती ।।५।। ऋषीमुनींना ध्यान शक्ती अवगत राजाश्रय मिळूनी राज […]

लज्जा

  साडी चोळी सुंदर नेसूनी, आभूषणें ती अंगावरती, लज्जा सारी झांकुनी टाकतां, तेज दिसे चेहऱ्यावरती   ।।१।।   आत्म्यासम ती लज्जा भासे, सौंदर्य जिवंत त्याच मुळें, लोप पावतां लज्जा माग ती, जिवंतपणा तो कसा कळे   ।।२।।   लपले असते सौंदर्य सारे, एक बिंदूच्या केंद्रस्थानीं शोध घेण्या त्याच बिंदूचा लक्ष्य घालतां उघडे करुनी   ।।३।।   विकृत ती मनाची […]

आकाशातील कापूस

कपाशीचे  ढीग अगणित विखुरले  दिसती आकाशीं मानव येथें उघडा  असूनी वस्त्र  अपुरें दिसे अंगाशी   ।।१।। कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे   ।।२।। पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा लाज  राखण्या मानवाची गरीब बिचारा विवस्त्र तो कीव करावी वाटे त्याची   ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

अमर काव्य

विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला, रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला ।।१।। जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी, खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं ।।२।। नाच गावूनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं, बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी ।।३।। छोटे होवून गेले काव्य, अमर राहिले आतां ते, प्रसंग जरी तो मरून गेला, कविता […]

त्यांची शाळा

आंस लागली मजला, बघून याव्या त्या शाळा, देहू, आळंदी, परिसर, जाऊनी तो धुंडाळला ।।१।। कोठे शिकले तुकोबा, कसे ज्ञानोबांना ज्ञान मिळाले, साधन दिसले नाहीं, परि तेज आगळे भासले ।।२।। विचार झेंप बघतां, आचंबा आम्हां वाटतो, कोठून शिकले सारे, मनी हा प्रश्न पडतो ।।३।। त्यांची शाळा अतर्मनीं, गंगोत्री ज्ञानाची ती, वाहात होती बाहेरी, पावन करी धरती ।।४।। […]

जीवन परिघ

एक परिघ आंखले ,  विधात्याने विश्वाभोवतीं, जीवन फिरते ,  त्याचे वरती ।।१।। वाहण्याची क्रिया चाले,  युगानुयुगें ह्या जगतीं, कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा,  एकांच परिघात फिरती ।।२।। जेंव्हां कुणीतरी थकून जाई  दुजा उठोनी मदत करी, जीवन मरणाची शर्यत  जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।। मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी  नियंत्रित करी जगाला, परिघ सोडूनी जाण्यासाठीं  दिसत नसे मार्ग कुणाला […]

हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ? खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ? पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेवून ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ? सारे […]

1 2 3 4 5 6 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..