नवीन लेखन...

सार्थकी जीवन

सारे जीवन जाते, आपले अन्न शोधण्याकडे, काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।। जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे, आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।। धडपड करी आम्ही, सारी देह सुखासाठी, विचार ही मनांत नसतो, इतरांच्या करिता ।।३।। वेळ काढावा जीवनातुनी, इतरांसाठी थोडा, सार्थकी लावा आयुष्य तुम्ही, जीवन शिकवी धडा ।।४।। डॉ. भगवान […]

चारोळ्या

 काळी बायको  (वात्रटिका) काळी तिरळी बायको लाभून,  मिळाले खूप समाधान. कसे काय बुआ  ?   असे विचाराल तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून सारेच चोर  (वात्रटिका) हासतात तुला वेड्या ते,   पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात,  चोर आहेस म्हणून माझी नोकरी (वात्रटिका) नकार देत होती माझ्या प्रेमाला,  बघून,  मी आहे एक बेकार जळत होते, जळत होते […]

दिवसां दिसणारा चंद्र

रे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं, भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं ।।१।। कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती, कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती ।।२।। शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत, एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात ।।३।। कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो, चुकून देखील तुझ्या […]

प्रवाही जीवन

वाहत असते जीवन सारे, वाहणे जीवनाचा गुणधर्म, स्तब्ध राहता जीवन आपले, कसे घडेल हातून कर्म ।।१।। वाहत होते, वाहत आहे, भविष्याते वहात जाईल, सतत चाले ही प्रक्रिया, जीवन करण्यास सफल ।।२।। आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो, निर्जीव वस्तूसुद्धा प्रवाही, अणूची ती बनली असूनी, प्रचंड हालचाल आत होई ।।३।। अणूत असूनी तीन भाग, अतिशय वेगाने फिरती, केवळ त्यातील […]

जागृत आंतरात्मा

कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी, न ऐकीली कधीही हाक तयाची कानी ।।१।।   चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी, नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।।   निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले, प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजिले ।।३।।   नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले, निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।।   तोच अचानक जाग […]

जीवन गुलाबा परि

जीवन असावे गुलाबा सारखे, सहवासे ज्याच्या मिळताती सुखे ।।१।। सुगंध तयाचा दरवळत राही, मनास आमच्या समाधान होई ।।२।। नाजूक पाकळ्या कोमल वाटती, सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती ।।३।। विसरूं नका ते काटे गुलाबाचे, बसती लपूनी खालती फुलांचे ।।४।। सुखाचे भोवती सावट दु:खाचे, जीवन वाटते झाड गुलाबाचे ।।५।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

गुणांची परंपरा

गादी चालविते माझी आई, माझ्याच आजीची, मला वाटते परंपरा, ती चाले घराण्याची ।।१।।   रात्रंदिनीचे कष्ट करणे, हा तिचा स्वभाव, प्रेमळपणे खावू घालणें, मनी तिच्या भाव ।।२।।   अधिकाराची नशा तिजला, शब्द तिचा कायदा, जुमानत नाही कुणाचाही, शाब्दीक तो वायदा ।।३।।   प्रेमळपणा असूनी अंगी, अहंकार युक्त ती, गुणदोषांनी भरले व्यक्तीत्व, तसेच पुढे चालती ।।४।।   […]

अनुकरण सोडा

अनुकरण करणे हा स्वभाव काय मग म्हणू मी त्याला हो…।।धृ।। स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी निर्णय शक्ती असते मनीं दुजाचे जीवन यश बघूनी, अनुकरण त्याचे करता हो….१, अनुकरण करणे हाच स्वभाव, काय मग म्हणू मी त्याला हो … त्याची स्थिती वेगळी होती म्हणून यश पडले हातीं वातावरण निराळे असती तुम्हास सारे हे कळते हो…..२, अनुकरण करणे हाच […]

गर्भावस्थेतील आनंद

जीवनातील परमानंद, केंव्हां लाभतो त्या जीवना ? मातेच्या त्या उदरामध्ये, शांत झोपला असताना ।।१।। असीम ‘आनंद’ अनुभव, घेत असे तो जीवात्मा सोsहं निनाद करूनी, सांगतो मीच परमात्मा ।।२।। आनंदाने नाचू लागतो, मनांत येता केंव्हां तरी, मातेलाही सुखी करती, त्याच्याच आनंदी लहरी ।।३।। पुढे त्याचे प्रयत्न होती, मिळवण्या तोच आनंद सुख, दु:खाच्या चक्रामध्ये, विसरूनी जातो तो नाद […]

गर्भातील अभिमंन्यू

  श्रीकृष्ण सांगतो सुभद्रेला, चक्रव्युंहामधली रचना, हुंकार मिळे त्याला, सुभद्रा झोपली असताना ।।१।।   गर्भामधले तेजस्वी बाळ, ऐकत होते सारे काही, जाण आली त्याची कृष्णाला, वळूनी जेव्हा तो पाही ।।२।।   चक्रव्यूहांत शिरावे कसे, हेच कळले अभिमन्यूला, अपूरे ज्ञान मिळोनी, घात तयाचा झाला ।।३।।   गर्भामधला जीव देखील, जागृत केंव्हां होवू शकतो, खरा ज्ञानी तोच असूनी, […]

1 3 4 5 6 7 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..